हरि हरी !

 *खिन्न करणारे असले तरी कानउघाडणी आवश्यक आहे....*


कुणीतरी फेसबुकवर उसने अवसान (म्हणजे भिकमागे) आणून नॉन वेजीटेरियन म्हणजे प्राणिज हो असूनही  पवित्र असलेल्या गोघृतात तळून निपजलेल्या आडनावाचे  कुणी कुणी मनुष्य जातीचच प्राणी आपल्या पोष्टातून आपले डूकरी ज्ञान पाजळतो आहे की...


"हरी ने आता त्यांना आता नरकातच बसवावे".


काय? 

म्हणजे हल्ली स्वर्ग नरकाचा अधिपती हरी म्हणजे माकड म्हणजे वानर झाला की काय ? हं

कोणी सांगावे ..


मूर्ख पोस्टचे व्याकरण तपासायला अर्धबुद्धी विसरला बहुतेक..


ह्या वाक्यातील कर्ता शब्द हरी याचा अर्थ माकड वानर असा होतो हे त्याच हरि ने (विष्णूने ) नारदाला समजावून सांगितले असा दाखला पुराणातून कीर्तनातून व्याकरण समजावून घेत आलो आहोत . नाई का ? 


    ...म्हणजे वानराने स्वतः 'त्यांना' नरक द्यावा ? 

असे म्हणायचे आहे का ? इथे त्यांना म्हणजे ज्यांनी आयुष्यभर ज्योतिबा सावित्री अशा शिक्षणमहर्षींद्वयी यांच्या कार्यावर काम केले. तद्वतच भाषेवरही काम केले. म्हणजे लेखनातून कार्य पोहचवले .. आणि स्वतःचे नाव हरि असेच आयुष्यभर लिहिले. या हरि म्हणजे विष्णूला चक्क हरी ने म्हणजे वानराने नरक द्यावा ? 

अरे अरे ! त्या हरि चे कर्म त्याला आयुष्यभर पुरले. त्याने लौकिक मिळवला पण त्याचा द्वेष करत तुम्ही इथेच नरक मिळवलाय... नंतर तर विचारूच नका .. 

अकबर बिरबलाची गोष्ट आठवते का .. दोघे स्वप्नात उडत असतात. अकबर पाहतो, उडता उडता दोघे पडतात  अकबर पडतो मधाच्या टाक्यात आणि बिरबल पडतो घाणीत .. आणि स्वप्न संपते.. सांगून अकबर हसू लागतो ... पुढे बिरबल सांगतो की पुढचे स्वप्न आपण पाहिले आहे ..पूर्ण स्वप्न जसेच्या तसे वर्णन करतो आणि शेवटचे वाक्य म्हणतो .. मग मात्र आपण एकमेकांना चाटू लागतो ... असे म्हणून गडगडा हसू लागतो....

तेव्हा आपल्याला काय चाटावे लागू शकते हे विचारपूर्वक   आपणच निर्माण करावे ....

हा सल्ला.... बाकी आपण जात्याच सूज्ञ असतोच की, नाईका ?  ...

  *अँब्रोस चेट्टियार*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी