अंनिस वार्ता मुथा school

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा..

वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन कार्यक्रम वृत्तान्त.

मंगळवार दिनांक : 8 सप्टेंबर 2023 रोजी सादर.

शेठ हिराचंद मुथा स्कूल, आधारवाडी, कल्याण-पश्चिम, 

ठाणे, महाराष्ट्र. 

सादरकर्त्या : माई वंदना शिंदे 


     ऐनवेळी म्हणजे आदल्या दिवशी सायंकाळी उशीरा कार्यक्रमाची माहिती मिळाली. समयासी सदैव सादर असणाऱ्या माईंनी झ्टपट सर्व तयारी जुळवणी केली. सकाळी सकाळी नारळ इत्यादी मिळवणे आणी सामानाची तयारी करून कल्याण ट्रेन येत नव्हती मग प्लॅटफॉर्म बदलून थोडी धावपळ करत अंबरनाथ रेल्वेने कल्याण गाठले. तेथून शाळेवर पोहोचण्यास थोडे आणखी दिव्व्यातून* जावे लागले नी दिमतीला पाऊस ही होता पण वेळेवर पोहोचण्याचा माईंचा शिरस्ता सर्वश्रृत आहे तो त्यांनी पाळला ? माईंनी शाळेवर पोहोचून सर्वांशी ओळख करून घेतली. चहापानानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. 

     संस्थेच्या स्काऊट गाईड वर्गाचे 100 एक मुलांच्या भरगच्च सभागृहात स्काऊट गाईड विभाग प्रमुख नीता मॅडम यांनी माईंची औपचारिक ओळख विद्यार्थ्यांशी शिक्षकांशी आणि प्राचार्यांशी करून दिली. माईंनी नेहमी प्रमाणे सर्वांशी संवाद साधत सुरुवात केली. प्राचार्यांकडून पाण्याचा दिवा लावून चमत्काराने विज्ञान कार्यक्रमाचा आरंभ केला. तत्पूर्वी विषय प्रतिपादन म्हणून स्काऊट गाईड विद्यार्थ्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन विषयावरील एक छोटेखानी कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. सर्व विद्यार्थ्यांनी आणि शाळेने उत्तम जागृती कार्य हाती घेतले आहे. या बाबत त्यांचे कौतुक आणि अभिनंदन माईंनी केले. एरव्ही कोणत्याही कार्यक्रमास सहसा अधिक वेळ देवू न शकणाऱ्या  प्राचार्या महोदया सव्वादोन तास सर्वांसोबत खिळून बसल्या होत्या असा त्यांनी शेवटी स्वतःच रुकार दिला. 

दरम्यान मुलांचा अल्पोपहार घेण्याची वेळ आडवी आली तशी सूचना स्वयंपाक गट सदस्याने येवून वर्दी दिल्यानंतर मुलांनी आपल्या प्रतिनिधी कर्वी मैंचा कार्यक्रम सलग पूर्ण होऊ द्यावा अशी एकमताने विनंती केली. माईंनी  भूत पकडणे, भानामती, अंगात येणे , कपूर खाणे असे सर्व चमत्कार दाखवत सर्वांना अचंभित केले. स्काऊट गाईड प्रमुख निता मॅडम यांनी स्वतः पुढाकार घेवून कपूर खाऊन दाखवला नी मुलांनी तल्यांचा कडकडाट केला. सर्वांचे उत्सुक चेहरे यामागील विज्ञान जाणून घेण्यास आतुर होते. माईंनी नेहमी प्रमाणे माहिती प्रबोधन गीत किस्से आणि आपण पकडलेले बाबा बुवा असे तपशीलवार उत्कंठावर्धक कार्यक्रम केल्याने आणि आपल्या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून कदाचित प्राचार्यांना तेथून जाणे सयुक्तिक आणि प्रशस्त वाटले नसावे. दरम्यान अनेक दाखले उदाहरणे देवून माईंनी सर्वांना कार्यक्रमात सामील करून घेतले व एकतर्फी न होता हसतखेळत संवादात्मक कार्यक्रम झाला या नंतर सर्व सामान आवरून प्रश्नोत्तरे घेतली आणि शंकासमाधान केले.. यानंतर ही खुर्चीत माई बसल्या असताना मुलांनी माईंना गराडा घातला.. त्यांच्या प्रश्नांना माई द्विगुणित उत्साहाने उत्तर देत होत्या.  हा सर्व सोहळा पाहून शिक्षकवर्ग उत्साहित होता. सर्वांसोबत दुपारच्या जेवणासाठी माईना आमंत्रण होते. त्यावेळी  "सकाळी आल्यापासून सलग सव्वादोन तास तुम्ही पाण्याचाही घोट न घेता उत्साहात कार्यक्रम सादर केलात. खरंच कमाल आहे तुमची!   आम्हाला खूप प्रेरणा मिळाली !"  असे कौतुकोद्गार  प्राचार्यांनी काढले.  मुलांच्या गट प्रमुखांनी माईंना त्यांनी बनवलेली मिसळपाव आग्रहाने आणून दिली. गोड कार्यक्रम 11 वा. ते 2:15 वा पर्यंत संपन्न झाला.. शेवटी पुन्हा आभार मानून गट प्रमुखांनी माईंना धन्यवाद दिले..  

वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन कार्यक्रम वृत्तान्त पूर्ण.

वृत्तांकन: अँब्रोस चेट्टियार

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा..


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी