वृत्तान्त ६ सप्टें २३

वृत्तान्त :  
वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियान कार्यक्रम.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर-शाखा.

दिनांक : ६ सप्टेंबर २०२३.
कार्यक्रमाची वेळ : दुपारनंतर ३ ते ५.
स्थळ : भारतीय महिला परिषद, माटुंगा पूर्व शाखा, मुंबई महाराष्ट्र.

   शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महिला परिषदेच्या मुंबई शाखेने माई वंदना शिंदे यांना प्रमुख अतिथी म्हणून पाचारण केले होते. *विशेष उपक्रम म्हणून संस्थेचा शिक्षक दिन साजरा करणे आणि कै. सरसाबाई नागपूरकर, संत व्याख्यानमाला* वर्ष ६१वे. असा कार्यक्रम होता .  *मागील दशकात चमत्कारातून विज्ञान कार्यक्रमात भेट झालेल्या संस्थेच्या शाखा सचिव पुष्पाताई सुर्वे यांनी  आठवण होऊन माईंना यंदाच्या आपल्या संस्थेच्या या उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून येण्यासाठी काही दिवसांपूर्वी निमंत्रित केले होते.*  विषय संत साहित्य आहे असे सांगितले. माईंनी तत्काळ होकार दिला. आणि संत शिरोमणी, संत तुकाराम महाराज यांचे अंधश्रद्धा निर्मूलन कार्य अशा अंगाने विषय प्रतिपादन करावे अशी तयारी केली. वारकरी कुटुंबातील संस्कार, संतसाहित्य आणि विठ्ठल भक्तीतून सामाजिक जाणिवा जपण्याचा जीवनक्रम. यामुळे माईंना या संधीचे सोने करायचे होते. तसा अभ्यास सुरू झाला. आ. ह. साळुंखे यांचा 'विद्रोही तुकाराम' हे पुस्तक  पूर्ण अभ्यासून.. त्यातील तुकारामांच्या आयुष्यातील अंधश्रद्धा निर्मूलन कार्य, भक्ती आणि अंधश्रद्धा यातील फरक समजावून सांगत . तुकारामांनी आपल्या वडिलोपार्जित सावकारीच्या व्यवसायातून जमवलेली माया कशी लाथाडली... *खरे शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती अभियान* कसे त्यांनी राबवले .. कित्येक पिढ्या जुलमाने जमा केलेली गरीब गरजू कुणबी शेतकऱ्यांची जमिनीची कागदपत्रे त्यांनी परत केली आणि त्यांच्यावरील कर्जाचे बाडच्या बाड इंद्रायणीत बुडवून नष्ट केले. आणि कर्जमुक्ती केली. रोज कष्ट करून मिळेल ते खाऊ पण बेइमानी नको म्हणत त्यांच्या पत्नी आणि मुलांच्या भविष्याचा विचार करून स्वार्थीपणाने काहीही शिल्लक ठेवले नाही. संत तुकाराम चित्रपटातील एका दृश्यात त्यांचे मोठे समाजकार्य ऐकून शोध घेत आलेल्या प्रत्यक्ष शिवछत्रपतिंना आदरपूर्वक सर्व ऐश्वर्य परत करून महाराजांनाच समाज कारणासाठी त्याचा उपयोग होईल असे विनम्रतेने सांगितले. काय ते औदार्य !  किती ती सामाजिक सद्भावनेची जाणीव ! ..  तसेच हभप. शामसुंदर सोन्नर महाराज यांच्या किर्तनातून समाजजागृतीचे सुरेख दाखले देत विषयाला समर्पक अभंग गाऊन त्याचे सार्थ  निरूपण करत माईंनी अंनिसच्या कार्यक्रमात एक आगळेवेगळे असे  व्याख्यानातून समाजसुधारकी अंगाने , सत्यशोधकी अंगाने , अंधश्रद्धा निर्मूलन करणारे मनोवेधक, कीर्तन रंगवले. आणि आणखी एक दालन आपल्यासाठी, अंनिस कार्यकर्त्यांकरिता उघडून दिले असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आपल्या प्रमुख अतिथी या पदावरून विचारमंचावरून व्यक्त केलेले हे विचार सर्वांना थक्क करणारे होते. अशा अंगाने आपला इतिहास पुन्हा एकदा पाहावा असे सर्वांना वाटल्यावाचून कसे राहील ?  तशी कबूली अनेकांनी दिलीही. सर्वांनी माईंचे खूप आभार मानले आणि भरभरून चर्चाही केली.
    ...माईंच्या व्याख्यानापूर्वी मंचावर उपस्थित संस्थेच्या अध्यक्षा, सचिव आणि महिलांना विविध जीवनोपयोगी कलांचे प्रशिक्षण देणाऱ्या विभागाच्या  विभाग प्रमुख उपस्थित होत्या ..  यातून शिवणकाम, पाककला इ. जीवनोपयोगी कामांचे समाजातील गरजू महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी काही नवीन प्रशिक्षिका ही तयार होत असतात. अशा नवीन आणि विद्यमान सदस्य शिक्षिका यांचा खरा हा कौतुक सोहळा होता. संस्थेच्या आजी माजी   विद्यार्थिनी, विविध विभाग प्रमुख, संस्थेच्या पदाधिकारी आणि ईतर  महिला सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होत्या .   संस्थेच्या दुमजली इमारती पैकी सदर सभा स्थळ हे सकाळपासून दुपारी २ वाजे पर्यंत संस्थेच्या बालवाडी करिता उपयोगात आणले जाते. आणि  ३ ते ५ असे ईतर कार्यक्रमास सभागृह उपयोगात आणले जाते. वरच्या मजल्यावर मात्र प्रशिक्षणास आवश्यक तजवीज केलेली आहे. *उल्लेखनीय विशेष बाबिंपैकी बाब म्हणजे सदर संस्था अरूणा असफ अली यांच्या हस्ते स्थापित झालेली आहे.* असा ऐतिहासिक संदर्भ आहे.   शिक्षिकांचा कौतुकसोहळा झाला आणि उत्तीर्ण विद्यार्थीनिंना प्रमाणपत्रे  प्रदान केली गेली. सोबत पुढे स्वतःचा व्यवसाय सुरु करता यावा या करिता काही रकमाही अनुदान म्हणून सामाजिक जाणिवेतून गरजू विद्यार्थिनिंना देऊ केली गेली. आरंभ ते समापन होईपर्यंत  सर्वांच्याच चेहेऱ्यावर छोटेखानी असले तरी काही तरी विशेष कार्य आपल्या हातून घडते आहे याचे समाधान ओसंडून वाहताना पाहून माईंना खूप प्रसन्न वाटल्याचे माईंनी व्याख्यानांती नमूद केले..
    ..सचिव पुष्पाताई सुर्वे यांनी  केलेल्या समारोपाच्या, आभाराच्या भाषणातून त्यांनी 'दशकापूर्वी पाहिलेल्या माईंच्या चमत्कारातून वैज्ञानिक दृष्टिकोन कार्यक्रमाचाही उल्लेख केला आणि त्याबद्दल खूप आठवणी सांगितल्या'. "दहा वर्षानंतरही  माईंचा आवाज आणि जोश तसाच कायम आहे. (हे मात्र खरेच ! माईंची हातोटी विशेष आहे.)  नी  त्यांचे कार्यक्रम खूपच रंगतात. त्यातून खूप लोक अंधश्रद्धा मुक्तही झाले आहेत "इ. असे अंनिस आणि माई यांचे कार्याचे खूप कौतुक केले. त्यामुळे सर्वांना तो कार्यक्रम पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
अशा प्रकारे अंनिस करिता भारतीय महिला परिषदेच्या संत व्याख्यानमालेतील हे व्याख्यान आणखी एक दालन उघडते झाले.
*व्याख्यात्या : माई, वंदना शिंदे. अंनिस.*  ( बस नाम ही काफी है) 😊🙏🏾
वृत्तांकन: अँब्रोस चेट्टियार, अंनिस कार्यकर्ता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी