14/10/2023

 

वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन कार्यक्रम अहवाल.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा.
स्थळ : भारतीय विद्या भवनचे भवन्स कॉलेज, अंधेरी मुंबई.
दिनांक: 14 ऑक्टोबर 2023.

   अंनिसच्या कार्यकर्त्या आणि भवन्स कॉलेज येथील प्राध्यापिका ज्योती मालंडकर आणि त्यांचे सहकारी यांनी आपल्या कॉलेजच्या मराठी वाङमय मंडळ आणि विवेक वाहिनी तर्फे कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थांकरिता विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सर्वपित्री अमावस्यादिनी आणि घटस्थापनेच्या पूर्व संध्येला विशेष विवेक जागृती कार्यक्रम घ्यावा असे स्वरूप होते.
जवळजवळ दिडशे विद्यार्थी आणि चार पाच प्राध्यापक अशी कार्यक्रमास शेवटपर्यंत उपस्थिती होती.
   व्याख्यात्या माई वंदना शिंदे यांच्याकरिता नवतरुणांसाठी कार्यक्रम घेणे हा नेहमी उत्साहाचा विषय असतो. कारण तेथून पोषक बदल हा निश्चितीची ग्वाही देणारा असतो. माईंनी सर्वप्रथम विद्यार्थांशी संवाद साधला. आणि पित्र, तर्पण विधी, श्राद्ध कर्मे आणि नवरात्रोत्सव, त्यातील पूजा, उपवास विधी त्यामागील विचार यावर चर्चा केली.
👉कोणी म्हणाले उपवासाने बरे वाटते , शुद्धी होते, या काळात आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी महिला, पुरूष व्रत करतात. कृपाप्रसादाने आम्हाला घर मिळाले वगैरे कोणी म्हणाले. तर यावेळी लोक बिन चपलेचे चालतात. नऊ दिवसाचे नऊ रंग परिधान केल्याने विशेष कृपा प्राप्त होते. अशा अनेक समजूती काही अगदी टोकाच्याही होत्या. अंगात येणे, अघोरी वर्तन वगैरे.
👉याला उत्तर देताना *माईंनी सर्व प्रथम घर मिळाले* यावर प्रश्न केले की घरासाठी पालकांनी काहीच मेहनत घेतली नाही का ? त्यांचे काहीच योगदान नाही का ? तेव्हा मुलगा पालकांचे अपार कष्ट मान्य करता झाला आणि अंतर्मुख झाला. आता आपण खूप अभ्यास करून यश प्राप्त करून पालकांचे पांग फेडायला हवे नाही का ? असे दिशादर्शक मार्गदर्शन त्याला केले.
👉दुसरे म्हणजे उपवास करणे त्याकाळात काय खातो त्याकडे ही लक्ष हवे शरीराला पोषण आवश्यक आहे. मेंदूला हृदयाला संपूर्ण शरीराला पूर्ण वेळ पोषण मिळायला हवे. अती झाल्यास काही बिघाड होऊ शकतो. सर्वानाच उपवास मनावरील असेही नसते. काहींवर जबरदस्ती होत असते. शारीरिक शक्ती कमी झाल्याने काम ही कमी होणार आणि उत्पन्नात ही घट होणार मग मानसिक शांती ढळणार मग द्वेष असूया निर्माण होऊ शकते.. समाजात पोषक वातावरण कसे टिकू शकेल ?  ह्यापैकी मुलांना बरेच मुद्दे पटल्याचे दिसत होते. पण घरी कसे करावे. असा प्रश्न होता त्यावर आपल्या पुरते आपण बदल करत गेलो तर पुढे सकारात्मक बदल होतात. सुदृढ शरीरात सुदृढ मन ही उक्ती लक्षात ठेवावी..
👉*नऊ रंगांचे* फॅड तर गेल्या दशकात वर्तमानपत्रांनी व्यवसायांच्या सहकार्याने केलेली जनतेची शुद्ध दिशाभूल आहे.  सर्व महिला ऐपत असो नसो त्या त्या रंगाची साडीची तजवीज करतात. त्यासाठी बाकी ही सर्व हवे त्याची जुळवणी हवी. मिळकत नसली तरी कर्ज काढून का होईना करणारच. इतका पगडा बसला आहे. याला उपाय शिक्षण आहे. अज्ञान दूर झाले की सर्व ठीक होईल.
👉*अनवाणी चालणे* पायवाटेवर वा हिरवळी वर पहाटे वगैरे ठीक. पण शहरात सिमेंटच्या रस्त्याने अनवाणी चालण्याने डोळ्यांना अपाय होऊ शकतो मेंदूवर परिणाम होऊ शकतो. ऑक्टोबर च्या आसपास उष्मा फार असतो. त्याच्या परिणामी उष्माघात होऊ शकतो , उन्हाळी लागू शकते , प्रसंगी जिवावरही बेतू शकते.
👉मुलांनो तुमचे असे अनेक प्रश्न असू शकतील तर आपण यापुढचा चमत्कारातून विज्ञान प्रबोधन कार्यक्रम ज्यातून ही तुमचे बरेचसे प्रश्न सुटू शकतील अशी मला खात्री आहे. तरी कुणाला काही शंका वा प्रश्न पडल्यास मला शेवटी जरूर विचारा. मी तुमची उत्तरे दिल्याशिवाय इथून जाणार नाही. माझा नंबरही लिहून घ्या. पुढे काही विचारायचे असल्यास संपर्क साधू शकता.
👉या व्याख्यानानंतर माईंनी प्रयोगास सुरुवात केली विभाग प्रमुख ज्योती मालंडकर यांच्या हस्ते पाण्याचा दिवा लावून आरंभ केला , भूत, करणी, अंगात येणे या सर्व विषयाबद्दल सादरीकरण वेळी अवाक होऊन मुले पाहत होती थक्क होत होती अनेक प्रश्न त्यांना पडत होते.  संवादात्मक चर्चेतून सलग सप्रयोग व्याख्यान माई दुप्पट उत्साहात देत होत्या.. त्यांचा उत्साह पाहून (मुले) विद्यार्थी आणि सर्व प्राध्यापक वर्ग आश्चर्याने थक्क होत होते. प्रश्नोत्तराचा तास म्हणजे विशेष होता...  नेहमी प्रमाणे माईंना उत्साहाचा उत्साही तरुण मुलामुलिंचा गराडा पडला होता.
   *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी