कृतज्ञता, प्रेरणा पुरस्कार
कृतज्ञता 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता म्हणून उणेपुरे एक दीड वर्षच काय ते झाले असेल.. परंतु माई वंदना शिंदे यांच्या दैदिप्यमान, दीपस्तंभरूप व्यक्तिमत्त्व आणि कार्याने प्रेरित होऊन त्यांच्या सोबत त्यांनी सांगितलेल्या कार्यक्रमास सवडीनुसार हजर होत गेलो.. त्यांच्या तरुणाला ही लाजवेल अशा जोशात सप्रयोग व्याख्यान ऐकताना भान हरपून पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षकांची गत व्हायची तशीच माझीही व्हायची .. खूप काही शिकायला मिळाले आणि खूप काही अजून शिकायचे आहे. मला विद्यार्थी म्हणून राहणे नेहमी पसंत आहे.. कार्यक्रम स्थळी जुजबी गोष्टी सांभाळताना माईंनी केलेले कौतुक मला सर्वोपरी आहे. सुरुवात केली तेव्हा पासून पाक्षिक बैठक न चुकवता ज्ञान प्राप्तीचा माझा प्रयत्न असाच अबाधित राहावा अशी आशा करतो..
....दरम्यान मी केलेल्या छोट्या मोठ्या योगदानाचे इतके काही मोठे बक्षीस आणि तेही लगेच मिळेल असे स्वप्नातही वाटणे शक्य नव्हते .. हे सर्व कसे घडले याचा मला उलगडा झाला नाही... परंतु यंदाच्या शाखा कार्यकारिणी निवडी पासून ते राज्यकार्यकारिणी जाहीर होई पर्यंत मला काहीच विशेष माहीत नव्हते .. अचानक नांदेडला तुला यायचे आहे.. असे माईंनी सांगितले आणि खुलासा केला.. तेव्हा आणि निवड समिती कडून व्हॉट्सॲप मेसेज येत गेल्या नंतर सुखद धक्का वजा मानसिक समाधान मला लाभले आणि आनंद तर अवर्णनीय असा होता.. मी तरीही माझ्या घरी कुटुंबात भावंडांना मित्रांना हे सांगितले नव्हते. माईंनी एका बैठकीत हा गौप्यस्फोट केला आणि सर्वांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. मी केलेल्या तोडक्या मोडक्या कामाचे मर्यादेपलीकडे चीज झाले होते..
आणि प्रत्यक्ष तो दिन उजाडला 30 सप्टेंबर..
विशेष दिवस. संपूर्ण दिवस कार्यक्रम पत्रिकेनुसार भरगच्च कार्यक्रम होते. आणि अनेक मान्यवर आणि सक्रिय कार्यकर्ते यांचे कार्य समजत होते. अनेक उत्सव मूर्ती समोर होत्या. अनेक अनुभवी कार्यकर्ते आपल्या वैयक्तिक आयुष्य खूप उंची गाठलेले असे काही कार्यकर्ते सहज होऊन भेटले आस्थेने विचारपूस करत .. प्रत्येकाला माई हिरीरीने माझी ओळख करून देत होत्या.. माईंकडून शिकण्यासारखे किती किती आहे..
कार्यक्रमाची सुरुवात मुळात माईंच्या गाण्याने झाली आणि मला पूर्ण खात्री पटली की मी एका खऱ्याखुऱ्या दीपस्तंभा सोबतच मार्गक्रमण करत आहे. कार्यक्रमपत्रिकेचा मुद्दाम उल्लेख टाळून उचंबळून आलेले विचार मी आज व्यक्त करत आहे. सवय नसल्याने उत्साहात माझ्या कडून कमी होती हे मात्र मी नमूद करतो कबूल करतो. आयोजक, संयोजक, ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते लहान मुलांच्या लगबगीने, उत्साहाने कार्यक्रमात सुसुत्रता ठेवत अर्थपूर्ण सादरीकरण करत होते, एक एक पुष्प गुंफत होते..
आणि सायंकाळी ठरल्या वेळी 7:30 वाजता माननीय पेंडसे सर प्रायोजित ग्रंथ दिंडीचे प्रेरणा पुरस्कार एकूण दहा जणांना राज्य भरातून जाहीर झाले होते त्यांच्या पुरस्कार प्रदानाचा सोहळा पार पडला. एखाद्या नव्या व्यक्तीला हा भव्य भासावा असाच सोहळा होता. कारण सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ नानावटी सर यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त करणे म्हणजे माझ्या सारख्या नवख्या व्यक्तीसाठी खूप मोठी गोष्ट होती.. आणि इथे ते प्रत्यक्षात घडत होते.. डॉ दाभोलकरांचे चित्राची पार्श्वभूमी .. राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार नानावटी सरांच्या हस्ते ..खूप मनाचा क्षण होता माझ्या साठी .. याच बरोबर आपली जबाबदारी वाढली हे ही लक्षात येत होते..या पुरस्काराचा यथोचित सन्मान माझ्या कडून राखला जाईल असे माझे वर्तन असेल याची मी ग्वाही देतो..
माई , नानावटी सर, निवडसमिती आणि अंनिस
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!!!
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid022d9iFuKek2HW4vWJqwoAsqjTDhBaFTCTMW4iu8ZEy7EzETkEfJ1PosbPNRgtSNgRl&id=100003707150724&sfnsn=wiwspmo&mibextid=6aamW6
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा