प्रेम

हे पहा ना 

डोळे उघडुन 

आपले ओळखीचे प्राणी पक्षी 

आपल्याला पाहताच धावत येतात..

त्यांचे प्रेम कसे उचंबळून येते ..

आता तरी डोळे उघडा ना 


जगाला हवे आहे प्रेम 

आणि तुम्ही बनवतात शस्त्रे ? 

प्राणी, पक्षी सर्व जीव प्रेमाची भुकेली 

पण तुमच्या कडे फक्त भेद बुद्धी का ? 

तुमचा तेवढा स्वार्थ तुम्हाला कळतो? 

प्रेमाची साद कळत नाही ?

माणुसकीची हाक कळत नाही ? 

अजबच आहे तुमचे... 


मात्र जाता तिथे शांतीचे पोवाडे बिनचूक गाता 

आणि इथे 

मृत्यूचा थयथयाट करायला मागे पुढे पाहत नाहीत.. 

किती हा क्रूरपणा ?  कुठून आणलात ? 

कोणी शिकवले तुम्हाला ? 

आमच्या पालकांनी, शाळेने, समाजाने असे काही शिकवल्याचे आम्हाला आठवत नाही..


मग हे सर्व तुम्ही शिकलात कुठे ?? 

आमच्या सारखे सर्वजनसुखाय सर्वजनहिताय

गीत तुम्ही बालपणी गाइले नाही काय ? 

साने गुरुजींच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या वाचल्या नाहीत काय? 

कुठून आणलात हा क्रूर अघोरी अमानुषपणा ?


आज माणसाला प्रेम हवे आहे 

आणि प्रेम देणाऱ्यांना तुम्ही गोळ्या देता ? 

असे किती दिवस चालणार ? 

सांगा सांगा कधी होणार अंत 

या अमानुषपणाचा ?

    *अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी