घडव घडव रे घटना |||

घडव घडव रे घटना |||


जे जे काही घडते 

घडविले वा जाते 

मोठे होते प्यादे 

त्यातुनी |


कोण प्यादा 

कोण करविता

झडकरी ओळखावा 

बुद्धिमत्या |


जिवावरची घटना 

पडताळून पाहावी 

आवेग पाहावा रोखण्याचा 

की घडण्यास साक्षी |


केसालाही धक्का 

लागो नये डील 

पेरलेला पैसा 

वाया जाईल |


सर्वतो राजकारण 

एकमेव धंदा 

सामान्यास वाली 

कोणी नाही |

     *अँब्रोस चेट्टियार*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी