उंदीर
Ohhh my my ....
या वरून माझं गेल्या काही वर्षातील निरीक्षण मी नोंदवित आहे ...
गेल्या दशकात खास करून इकडे उंदिर मामाचा त्रास खूप वाढला आहे. तेव्हा काय करावे अशा विचाराने विविध उपाय करत करत जेव्हा बिस्कीट किंवा क्रीम tube वा औषध घालून खाण्याचे पदार्थ ठेवले असता.. थोडी खुडबुड झाल्या नंतर लहानग्यांच्या सुळसुळाट पूर्ण बंद होत असे.. आणि मोठे उंदिर वा चिचुंद्री फिरताना आढळत.. आणि ठेवलेले त्यांचे जीवघेणे खाऊ गायब होत वा त्यांच्या जागा बदललेल्या दिसत. आपण मग घेत राहायचा काही उंदिर मरतात का etc पाहायचे .. औषधाच्या तीव्रतेनुसार एक दोन दिवसात तसे पडलेले दिसायचे.. पण आश्चर्य...एकही लहानगे पिल्लू ते औषध खाऊन मेलेले सापडले नाही अजून तरी फक्त मोठे उंदिर वा चिचुंद्रीच फक्त सापडत..
एक दोन वेळा लक्षातच आले नाही ..नंतर मात्र आश्चर्य वाटले आणि सुन्न व्हायला झाले ..घरात त्या विषयावर emotional चर्चाही झाली..
पिलांच्या तोंडी पडायला नको म्हणून विषाची चाहूल लागताच .. मोठे ते सर्व तुकडे जमा करत आणि दरम्यान त्याची विषबाधा होऊन त्यांचे प्राण गमावत असतात हे प्रकर्षाने जाणवले आणि हा पॅटर्न आजतागायत बदललेला नाही... अधून मधून त्रास वाढला की असा अघोरी उपाय माणसाला करावा लागतो. पण ते जीव त्यांचे कर्तव्य चोख बजावतात...
काय करावे ते खूप त्रास देतात तेव्हा औषध घालावे लागते..
पण त्यांची ही बाजू मला खूप अंतर्मुख करून गेली आहे.. हे आठवले की काही वेळ तरी मी सुन्न होतो अजूनही...
*अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा