अहवाल अंनिस कुर्ला गाडगेबाबा शाळा

 


*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा.* *वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन कार्यक्रम अहवाल*
*स्थळ : संत गाडगेबाबा विद्यालय, कुर्ला-पश्चिम, मुंबई.*
दिनांक : 20 ऑक्टोबर 2023
वेळ : सायंकाळी 4 वाजता.

  👉 पार्श्वभूमी :
या बहुप्रतिक्षित कार्यक्रमाची उत्सुकता आम्हा सर्वांना होती.
याचे कारण असे,
.....मागे काही कार्यक्रमानिमित्त माई वंदना शिंदे, कुर्ला विभागात गेल्या असताना तिकडे न्यू मिल रोड कुर्ला पश्चिम येथे एक शाळा आढळली. नाव पाहिले तर संत गाडगेबाबा विद्यालय, म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. जाऊन भेट दिली तर समजले की तेथे वसतिगृहही असून महाराष्ट्र भरातून गरजू विद्यार्थी येथे येऊन, राहून शिक्षण घेतात.. अगदी पहिली पासून ते 10 वी पर्यंत शाळा आहे. शासकीय सहाय्यातून चालणारी मराठी शाळा आणि वरच्या मजल्यावर विनाअनुदानित इंग्रजी माध्यम शाळा. ऐसपैस परिसर भर मुंबईत अशी शाळा नी आवार तसे दुर्मिळच म्हणाना. पण, इथे, अगदी कुर्ल्यात, अशी शाळा  आहे खरी.   संत गाडगेबाबांच्या नावाला शोभेल अशी, स्वच्छ, नीटनेटकी शाळा.. सर्व काही जागच्या जागी नी व्यवस्थित. देखणे वर्ग,  योग्य नी पूरक फलक लेखन, शिस्तबद्ध शिक्षणपुरक वातावरण असलेली, आपली वाटावी इतकी गोड, गाडगेबाबांच्या नावाची शाळा आणि इथे भर मुंबईत कुर्ल्यात हे पाहूनच सुखद धक्का होता..
...तत्पर शिक्षक, प्राचार्य आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, सर्व झाडून शिक्षण सेवेत रुजू .  अगदी भारावून जावे असे वातावरण.. वगैरे.. असे माईंनी दोनेक महिन्यांपूर्वी माहिती दिली होती . तेव्हा पासूनच उत्सुकता होती.
👉नंतर लगेच माईंचे वरचेवर होणाऱ्या संभाषणातून आपल्या *S S शिंदे सरांशी ही या बद्दल सहज चर्चा  केली होती .  तेव्हा सरांनी आश्चर्याचा धक्का देत  माहिती पुरविली होती की ही शाळा ते ओळखून आहेत.  कारण ते स्वतः तिथून शिकले आहेत.  तेव्हा येथे फक्त वसतीगृह होते.  काही अंतरावरील शाळेत जावे लागे. *शिंदे सरांची शाळा. हा आश्चर्याचा सुखद धक्काच होता. दुनिया गोल है..नई का ?*
आता तर येथे लवकरात लवकर कार्यक्रम घेणेच लागते ब्वा .. असे झाले होते.
👉...आणि ती संधी माईंच्या अविरत पाठपुराव्यामुळे आज शक्य झाली होती.  अगदी आजच्या झालेल्या तिसऱ्याच संभाषणात कार्यक्रम ठरला देखील. आणि  ऐनवेळी उपलब्ध होऊ शकेल असा हुकमी सवंगडी म्हणजे अजित दादा. माई नी अजित डफळे असे दोघे सादरीकरणास सहर्ष, सादर, समर्पित अंनिसचे खंदे कार्यकर्ते.  या बाबतीत दोघांना अनंत नमस्कार.
👉आरंभ ...नेहमी प्रमाणे पाण्याचा चमत्कारिक दिवा प्राचार्य लवटे सर यांच्याहस्ते लावून माईंनी सप्रयोग व्याख्यानास सुरुवात केली. हा हा म्हणता सभागृहातील अगोदरच शिस्तबद्ध असलेल्या विद्यार्थ्यांची निशब्द चुळबुळ शांत झाली नी सर्वांचे लक्ष चमत्कारांकडे वेधले गेले. एका मागून एक सर्व चमत्कार पाहून अर्थातच मुलांना प्रश्न पडत होते असे त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होते.  अगोदरच आवाहन केले गेले होते की शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.  मुलांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सूचनांचे पालन केले.
👉शाळेचा एकूण पट 1 ते 10 असा 250 विद्यार्थी आहे. पैकी  इयत्ता 5 ते 10 पर्यंतची 150 मुले सदर कार्यक्रमास उपस्थित होती.  प्राचार्य लवटे सर , उप प्राचार्य बाविस्कर सर, चौधरी मॅडम आणि सहकारी सर्वांनी कार्यक्रमाबद्दल खूप चांगले उद्गार काढले विद्यार्थांनाही वेगळा उत्साह आत्मविश्वास जाणवत होता. वार्तापत्राची माहिती सांगून त्याकरिता आवाहन केले आणि कार्यक्रमाची समारोप झाला. तरी प्रश्नोत्तरे हा बौद्धिक कार्यक्रम सुरू होता .
👉जेवढा पुरावा तेवढा विश्वास हे वाक्य त्यांच्या मेंदूत चांगले बसले होते. शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्वांना अंनिसचा प्रबोधन कार्यक्रम खूप आवडला. अनेक कारणांमुळे असे कार्यक्रम येथे होऊ शकले नाहीत अशी खंत त्याच्या तोंडी होती. हे  ऐकल्यावर खूप हळहळ वाटली. प्रत्यक्ष गाडगेबाबा विद्यालयात वैज्ञानिक प्रबोधन कार्यक्रम होऊ शकले नाहीत . असो.
या पुढे याची आपल्या परीने काळजी घेता येईल.
आपले अनेक उपक्रम येथे घेता येऊ शकतील आणि विद्यार्थांचे वैज्ञानिक जाणिवा प्रबोधनाचे कार्य साध्य करता येईल.
याउप्पर म्हणजे नेहेमी प्रमाणे माईंनी उत्साहात सादर केलेल्या 👉आजच्या कार्यक्रमाने आनंदित व थक्क झालेल्या प्राचार्यांनी आपल्या सहकार्यांशी अविलंब सल्लामसलत करून येत्या 20 डिसेंबर 2023 रोजी गाडगेबाबा स्मृतीदिनानिमित्तच्या कार्यक्रमास माईंना येण्याचे आमंत्रण दिले. आजचा दिवस अनेक अर्थांनी खूप उत्साहपूर्ण होता. खूप चांगली प्रेरणा देणारा होता.
वृत्तांकन : अँब्रोस चेट्टियार
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी