नको रे मना
नको रे मना
नको रे मना,
आज वाटे
ऊंच तुझी भरारी
आज वागताहे
स्वतःच स्वयेचि
सोडून पायरी
आज नको वाटे
स्वप्नांची उड्डाणे
आज मन वाहे
शोधित उभारी |
...नको रे मना,
आज वाटे ऊंच तुझी भरारी
दृष्ट नाही आज
मानव्य जगात
मायेस मुकली
पाखरे रणात
बोडके नभाचे
डोईवरी छत
पाउले रुतली
राखेच्या ढिगारी |
...नको रे मना,
आज वाटे ऊंच तुझी भरारी
धास्तावले श्वास
नाही दिसे थारा
कोवळ्या फुलांच्या
ऊर फोडी कळा
नजरे भकास
शोधिती पालका
त्यांस तात माता
आता न भेटती
..नको रे मना,
आज वाटे ऊंच तुझी भरारी
मोडले घरटे
विस्कटले रान
छत्र कुटुंबाचे
हरपले
त्याहून का मोठे
अभय कुणाचे
बाप माय मोठे
साम्राज्याहुनी
..नको रे मना,
आज वाटे ऊंच तुझी भरारी
केवळ विसावा
शोधित जाई
मिळेना उसंत
क्षणभरी
एक तू करावे
व्हावे निर्विकार
वा बा छळू नये
कोणासही
वा बा छळू नये
कोणासही
वा बा छळू नये
कोणासही
..नको रे मना,
आज वाटे ऊंच तुझी भरारी
*अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा