डोळे उघडा, भारत जोडा....|

 

डोळे उघडा,
भारत जोडा....|

ज्या गांधीने उपोषणाचे शस्त्र आपल्या हाती दिले त्या गांधीचे गंगेकिनारी असलेले जगप्रसिद्ध, रेल्वे कडून रीतसर विकत घेतलेले सेवा धाम स्मारक नष्ट होत असताना जग हळहळत होते, गांधीवादी जन समुदाय वैयक्तिक आणि साखळी उपोषण करून माणुसकीची मशाल पुन्हा जागवत होते. हे कार्य स्थानिक पातळीवर युवकांकडून झिरपत समाजात जाऊ लागले ही होते..परंतु पुन्हा तसली एकी जनतेत झाली तर राजकारण्यांच्या उरावर बसेल हे ओळखून खाडकन जागे झालेल्या बुळग्या नेत्यांना ,  पद्धतशीरपणे आपले बस्तान टिकवण्याकरिता त्याच उपोषणाचे तंत्र वापरणे बरोब्बर जमते... नी जनभावनांना वेळोवेळी हायजॅक करून देशातील महत्वाचे पेटते प्रश्न कसे गार करायचे हेही चांगले जमते . जमत नाही ते काय तर खर्रीखुर्री समाजसेवा.. हंम.. याच खेळीतील काही घटनांचे साक्षीदार आज आपण सर्व होत आहोत. पण , पण अशाच वेळी तर आपली सदसदविवेक बुद्धी जागृत राहावयास हवी ना. आपण आज नेमके काय वाहतोय ते योग्य की अयोग्य ?
.....हे आपापल्यापुरते तरी स्पष्ट व्हायला हवे. म्हणजे येणारा काळ आपल्याला योग्य न्याय देऊ शकेल.. बसइतकेच ..
डोळे उघडा,
भारत जोडा....|
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी