मनोगत वजा अहवाल

 

मागे वळून पाहताना

राज्यकार्यकारिणीस येताना अनुभव, मनोगत वजा अहवाल लिहून आणलेला होता तो आता इथे सादर करतो...

आदरणीय डॉक्टर दाभोलकर यांच्या
परम आदरणीय विचारांनी प्रेरित, उपस्थित आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनिंनों म्हणजेच आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हो सर्वांना सविनय सादर नमस्कार🙏🏾

मी अँब्रोस चेट्टियार, महाराष्ट्र अंनिस ठाणे शहर शाखेचा एक नवीन आणि सामान्य कार्यकर्ता. माझ्या अंनिस प्रवासाची सुरुवात त्रिशला शहा ताईंच्या कार्याच्या प्रेरणेमुळे झाली तो एक इतिहास आहे त्याबद्दल मी नंतर कधीतरी सविस्तर सांगेन. त्यांनी मला आपल्या ठाण्याच्या स्थानिक शाखेशी संपर्काचा सल्ला दिला. आणि माईंशी माझी भेट होऊ शकली. ती ही सहज झालेली नाही, तो ही किस्सा पुन्हा केव्हा तरी नक्की.
      तर, गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून जी पाक्षिक बैठकीस मी येण्यास सुरुवात झाली तिथूनच माझी अंनिसच्या चमत्कारांशी ओळख व्हायला सुरुवात झाली. त्यातूनच पुढे काही *भानामती सदृश* ,  *झपाटलेले* वगैरे प्रसंगातून पीडितांना सोडवताना आणि  *चमत्कारातून वैज्ञानिक दृष्टिकोन* दाखवणारे कार्यक्रम करत असताना  सोबत *माहितीपूर्ण धावते व्याख्यान माईं वंदना शिंदे यांना देताना पाहिले* आणि अशी काही गट्टी माईंशी जमली की गोरेगावचे एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर असो की एखादे समविचारी संस्थेचे निदर्शन असो की कोण्या मंडळात चमत्कार कार्यक्रम असो असे जमेल तसे सोबत जाणे, उपस्थित राहणे, शिकणे नियमित सुरू झाले. 
  ......आणि मग पुढे एन.डी. पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन कार्यक्रम मिळाल्यामुळे एक नियोजन बद्ध कार्यक्रम सुरू झाला. 2022-23 शैक्षणिक वर्षात किमान 100 कार्यक्रमांचे उद्दिष्ट ठरवले गेले. पण सांगायला अभिमान वाटतो की 120 हून अधिक कार्यक्रम मागील वर्षी पुूर्ण झाले. आणि त्यानंतरही तो प्रवास काही थांबलेला नाही आता पर्यंत तो आकडा 150 पर्यंत पोहोचला आहे.  पैकी एके ठिकाणी संपूर्ण सादरीकरण माईंच्या मार्गदर्शनात मी करू शकलो . या संपू्र्ण कार्यक्रमाचे चोख नियोजन आपल्या One man Army म्हणून ख्याती असलेल्या, आपल्या लाडक्या माईं म्हणजेच वंदना शिंदे यांनी केले होते.
*सादरीकरण सहायक*
या कार्यक्रमांत शाखेचे सक्रीय सदस्य , ज्येष्ठ सदस्य प्रकाश पारखे सर , आणि अक्षिता पाटील मॅडम, मित्र अजय भोसले पुष्पाताई तापोळे, अथर्व लिपारे , मनोज पवार,  हेमलता आणि ईतर जमेल तसे माईंसोबत, आमच्यासोबत असत.  तसेच सादरीकरण सहाय्य, मंच संचालन, छायाचित्र -फोटो, वृत्तांकन इ माझ्या आवडीच्या कामांची  संधी मला लाभली.. पत्नी कल्पना चेट्टियार सुद्धा अंनिस सदस्य आहे त्यामुळे आम्ही जोडीने बैठकीस उपस्थित असतो. जेव्हा एकत्र  शक्य असेल तेथे एकत्र कार्यक्रमास जातो. कधी माईं सोबत महिला विशेष कार्यक्रमास शक्य असेल तर कल्पना जात असते. असा कौटुंबिक जिव्हाळ्याचा व जबाबदारीचा विषय अंनिस होऊन गेला आहे. आणि विशेष उल्लेख करायचा म्हणजे अजित डफळे दादा यांनी जवळ जवळ सर्वच सादरीकरण वेळी माईंची सावली सारखी साथ केली आहे. माईंनी वेळोवेळी सर्वांचे कौतुक केले आहे. खाऊही दिला आहे. खास उल्लेख करायला हवा,  नारळातून करणी काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी नारळ खोऊन त्यात  खरपूस भाजून रवा नी गूळ घालून माई लाडू करतात आणि आमची मेजवानी होते. बैठकीस पुष्पाताई म्हणजे आमच्या खाऊ ताई असतात. नेहमी काही तरी खाऊ आणतात.. पुन्हा पुन्हा सांगायलाच हवे  सर्व कार्यक्रमात माईंचा सिंहाचा वाटा असतो हे निसंशय, निर्विवाद. त्यातून त्या धडा ही देतात . आधी केले मग सांगितले आणि बोले तैसा चाले .. हे बिरूद माई जगताना दिसतात.. खूप सांगता येईल मला आपल्या माईं बद्दल कारण डॉक्टरांसोबत प्रत्यक्ष काम केलेल्या कार्यकर्त्या आहेत.., त्या अनुभवी काटक कार्यकर्त्या आहेत.. 
👉 शाखेच्या कार्यक्रमांची यादी अशी खालील प्रमाणे करता येईल
*सप्रयोग चमत्कारातून विज्ञान प्रबोधन व्याख्यान शाळा कॉलेज सोसायटीत इ.. उत्सवात इ.. जमेल तेथे घेणे
*विविध समस्यांबाबत Counselling करणे
*भूत , भानामती,  करणी बाधा ग्रासित लोकांचे प्रश्न सोडवणे ,
*गावपातळीवर तंटामुक्ती विभाग सरपंच पोलीस पाटील इत्यादींशी भेट घेऊन पीडित व्यक्तीस मदत पुरवणे .
*काळजीपूर्वक मानसिक रुग्ण निदान करून  इलाज करिता पाठवणे
*कुटुंबातील लहानग्यांच्या भावनिक विश्वासाची कुटुंबाला जाणीव करून देणे. त्यांच्या जबाबदारीची जाणिव करून देऊन सुज्ञ सल्ला देणे.
*कौटुंबिक कलह सोडवून घर , कुटंब नांदते करणे .
*बुवा बाबाच्या विळख्यात सापडलेल्या लोकांना सोडवणे आणि शक्य तेवढे बुवा बाबाला कायद्याच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करणे.. वा पीडितांना सावध करणे.
*महिलांचे विविध प्रश्न पाळी गैरसमज वयात येताना इ..सव्याख्यान  सोडवण्याचा प्रयत्न करणे .
*वेश्या व्यवसायातील महिलांचे भवितव्य , भावविश्व,  अनिश्चितता ,  त्यांच्या मुलांच्या भवितव्या बाबतीत  प्रबोधन करणारे कार्यक्रम समविचारी संस्थेसोबत मिळून आखणे..
*महिला सक्षमी करणे व तसे करणाऱ्या , विविध योजना राबविणाऱ्या संस्थेत जाऊन त्यांच्या ही अंधश्रद्धा दूर करणे ..
*संत साहित्यातून अंधश्रद्धा निर्मूलन कीर्तन वजा व्याख्यानदेणे असे आणखी ही कार्यक्रम असतील ज्याचा मला आता विसर पडत असेल ..
माझ्या अंनिसच्या कार्याला माईंसारखा खंबीर मार्गदर्शक दीपस्तंभ लाभल्याने, मला या महान कार्याचे खरे महत्व पटून गोडी लागली, हे मी प्रांजळपणे कबूल करतो.
हे कार्य करताना विविध ठिकाणी प्रत्यक्ष आणि काही सोशल मीडिया ग्रुपवर आपल्या सारख्या अनेक अनुभवी ज्येष्ठ मान्यवरांशी ओळख झाली हा माझा जाता जाता खूप मोठा झालेला फायदा आहे. ज्या करिता मी स्वतः काही ही विशेष केलेले नाही. एरव्ही हे होणे इतक्या सहजी तरी शक्य  नाही. आपले अनेकांचे आशिर्वाद मिळाले प्रभा ताई,  निखारगे ताई, अण्णा कडलास्कर सर , निशा भोसले ताई, मुक्ता ताई , त्रिशला ताई अशी यादी मोठी आहे. आपले आशिर्वाद, कौतुकाचे शब्द आणि दुरस्थ का होईना पण मार्गदर्शन मला सतत मिळत गेले, त्यामुळे माझी ऊर्जा वाढत गेली. या सर्वांमुळे मी अगदी पहिल्या वर्षीच खूप काही चांगले शिकू शकलो आणि आज आपल्या समोर आपल्याच प्रेरणेने चक्क प्रेरणा पुरस्कार प्राप्त करत आहे.  याहून आणखी जास्त काय चांगले असू शकेल ?  माझ्या आयुष्यातील, सामाजिक कार्यातील हा प्रथमच असा कोणालाही हवाहवासा वाटणारा बहुमान आहे. अर्थात यामुळे जबाबदारी वाढली आहे, हे ही जाणवते आहे . ह्या प्रसंगाने मी किंचित स्तिमित ही आहे. आणि सुटलो ही आहे , नाही का ?  आता थांबायला हवे.. आपल्या सर्वांच्या बहुमोल मार्गदर्शनाने या पुढेही मी हे उत्तम कार्य पुढे नेण्यास सक्षम होत राहीन अशी मला खात्री आहे.
यातील चांगले ते सर्व आपणा सर्वांचे आहे
आणि न्यून ते सर्व माझे आहे l
कळावे, लोभ असावा.
खूप खूप धन्यवाद.
या विवेकाच्या वारीत एक शब्दसाद आवश्यक वाटते |
|ऊठ मानवा जागा हो विवेकाचा धागा हो |
अंनिस कार्यकर्ता अँब्रोस चेट्टियार.
म.अंनिस ठाणे शहर शाखा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी