माझी शाळा

 



मला ओळख दिली 

मला भाषा दिली 

मला व्यक्त होण्यासाठी 

खुले अस्मान दिले          -2

मी धन्य धन्य आहे

मला ती लाभली

प्रिय माझी 

माझी शाळा... ll  - 2


दबकत बिचकत 

येता मजला 

गोडी लावत 

कवेत घेई 

माझी शाळा 

माझी शाळा 


पहिली यत्ता 

पुस्तक कसले 

पाटी नाही 

पेन्सिल कुठले

काव्य पाठ तो 

गाती गुरुजी 

रमुनी गावे

उठ मुला...


मुमुक्षित त्या नजरा असतील 

पाठवाचना पुस्तक शोधित..

गृहकार्यास्तव काय करावे 

पाटी पेन्सिल नसता झुरावे..


पुढच्या दिवशी पुढचे सारे 

धडे शिकवले पाठ करावे..

घडा घडा मी घोकत जावे 

मात पित्याने की ऐकावे...

त्यांची त्यांना विवंचना ती 

पोटासाठी काय करावे


असे निपटले दिन बाल्याचे

एकाहून एक सुरस कथेचे..

तरी बोच ना मनात काही ..

आठवुनी ही सुख ते व्हावे..

सापेक्षता ही सुख दुःखाची 

बक्कळ माया बालपणाची

इथे थांबुनी पुन्हा भे टु या 

अनुभव सारे पुन आठवुया 










               

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी