परतफेड
परतफेड
त्या ज्वाळांच्या मुखावर बसलेल्या एकएकाला
परावृत्त करण्याच्या नादात
आपले पाय पोळत असतानाही
केव्हा ज्वाळामुखावर पोहोचलो कळलेच नाही
आणि ते छद्मी ,
ते छद्मी पलिकडे पायउतार होऊन
त्याच ज्वाळा भडकविण्यासाठी
प्रचंड जोमाने आसुरी आनंदात
इंधन सारताना दृष्ट होत आहेत.
वाह वाह काय ही परतफेड !
*अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा