पाक्षिक बैठक वृत्तांत :

दिनांक : 19 नोहेंबेर 2023

*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*


 आज रविवार दिनांक 19 नोहेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता  पुष्पाताई तापोळे यांचे घरी, सुरंगी , Voltas कामगार कॉलनी वसंत विहार,  येथे झालेल्या पाक्षिक बैठकीस उपस्थित सदस्य 

1) माई वंदना शिंदे

2) ज्योती कांबळी 

3) कल्पना चेट्टियार 

4) तापोळे सर 

5) पुष्पाताई तापोळे

6) अथर्व  लिपारे 

7) माया ताई 

8) सीमा ताई 

9) मेघना कानडे

10) अजित डफळे

11)  नितीन भवर

12) प्रो. बी बी मेश्राम

13) अँब्रोस चेट्टियार 


☑️ थोड्या अवांतर आणि सद्य परिस्थितीवरील स्वाभाविक चर्चा झाल्यावर अंनिसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या माईं वंदना शिंदे यांनी आज इंदिरा गांधी जयंती अभिवादन करून पुढील दिवशीच्या प्रबोधनकार ठाकरे यांचे स्मृतीप्रीत्यर्थ *देवळांचा धर्म ..*  ह्या त्यांच्या पुस्तकातील आजच्या घडीला, विचार करायला लावणारा समर्पक उतारा वाचून दाखवला. 


☑️ चळवळ गीत सदरात 

१) साधं विज्ञान विसरला ,  

२) बाप्पा मोरयाला गणरायाला निरोप,

३) शुर गडी तू वीर गाडी तू,  हे पुष्पाताईंचे आवडते गीत इत्यादी गीते माईसोबत सर्वांनी गाईली


☑️ *सप्रयोग चमत्कार सादरीकरणातून विज्ञान* कार्यक्रम पैकी  बोलता बोलता हवेतून सोन्याची साखळी काढून दाखवणे , हा चमत्कार माईंनी करून दाखवला, शिकवला .. आणि आपल्या आवडत्या नदीचे पवित्र तीर्थ देणे हा चमत्कार अँब्रोस यांनी दाखवला त्या दोन्ही मागील वैज्ञानिक कारण ही स्पष्ट केले. 


☑️नवीन सभासद प्रा. डॉ. बी बी मेश्राम सर यांचे अंनिस ठाणे शाखे  मध्ये आगमन.. अंनिस कार्यकर्ते नितीन भवर यांचे मेश्राम सर यांना आणण्यात विशेष मोलाचे कार्य..  


☑️ तापोळे सर यांचे कायदेविषयक ज्ञान आणि सध्य स्थितिवरील छोटेखानी व्याख्यान रूप चर्चा माहिती भर घालणारी होती..


☑️ अंधश्रद्धा निर्मूलन कायदा याबाबतीत माईंनी थोडक्यात  माहिती दिली.. त्यातील बारा कलमे . त्यावरील माहिती पुस्तक सर्वांना दिले जेणेकरून कायद्याचा अभ्यासकरून समाजात जागृती करण्यास त्याचा उपयोग होऊ शकेल. 


☑️ पुष्पाताई आणि त्यांच्या दोघी मुलिंनी व नातू अथर्व यानेही सुस्त्र सहभागाने स़्ंपूर्ण मिटिंग मध्ये सावधान लक्ष देत पाहुणचार अल्पोपहार याची उत्तम व्यवस्था ठेवली त्या बद्दल त्यांचे खूप आभार. अन्नदाता सुखी भव !  प्रत्यक्ष चर्चेतही विविध विषय समजून घेत आपले अनुभवही प्रसंगानुरूप मांडले. 


👉 महत्वाचा मुद्दा अधोरेखित करतो, लवकरच अंनिसचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आपण घेऊ त्यात अंनिस आणि कार्यपद्धती याबद्दल ये़ोग्य मार्गदर्शन प्राप्त होऊ शकेल. 


☑️*पुढील पाक्षिक बैठकीचे नियोजन -

 पुढील बैठक  *10 डिसेंबर 2023 रोजी आपण अंनिस सदस्य आणि कार्यकर्ते कल्पना आणि अँब्रोस चेट्टियार स्थानी घेत आहोत.*  

 त्यांचा पत्ता खाली देत आहे..


👉 कल्पना अँब्रोस चेट्टियार 

C/O वायाळ हाऊस, 

गार्डन गणेश मंदिर समोर, 

Hdfc bank पासून उजवीकडे 

डोंगरीपाडा, ठाणे पश्चिम.

मोबाईल : अँब्रोस 9870340173


वृत्तान्त अहवाल सादरिकरण अँब्रोस चेट्टियार.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


*महत्वाचे* 👇 

🙏 *सभासदांनी कृपया वृत्तान्त अहवाल वाचून पुढील बैठकीस उपस्थिती बद्दलची माहिती म्हणून खालील यादीत आपले नाव नोंदवावे , धन्यवाद 🙏* 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


मी येत्या 10 डिसेंबर 2023 रोजी,  कल्पना आणि अँब्रोस चेट्टियार यांचेकडे  डोंगरीपाडा,  ठाणे  येथे होणाऱ्या पाक्षिक बैठकीला हजर राहीन.. 


1) माई वंदना शिंदे 

2) कल्पना चेट्टियार

3) अँब्रोस चेट्टियार

4) पुष्पाताई तापोळे

5) अथर्व  लिपारे

6) ज्योती कांबळी

7)

8)

9)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी