पाक्षिक बैठक वृतांत :

दिनांक : 5 नोहेंबेर 2023

*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*


 आज रविवार दिनांक 5 नोहेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता  अजित डफळे यांचे घरी, 'तृणपुष्प सोसायटी येथे झालेल्या पाक्षिक बैठकीस 


उपस्थित सदस्य 

1) माई वंदना शिंदे

2) ज्योती कांबळी 

3) जय कांबळी 

4) राजेंद्र चव्हाण  

5) पुष्पा तापोळे 

6) अथर्व  लिपारे 

7) अजित डफळे

8) कल्पना चेट्टियार 

9) अँब्रोस चेट्टियार 


☑️ डफळे कुटुंबीयांकरिता सर्वांची ओळख करून घेण्यात आली ..

☑️ चळवळ गीत सदरात 

१) साधं विज्ञान विसरला ,  

२) बाप्पा मोरयाला गणरायाला निरोप(लहान मुलांकरिता आकर्षक चालीवर ) 

३) मैं अच्छी हू घाबराउ नको ... ही गीते माईसोबत सर्वांनी गाईली

☑️ *सप्रयोग चमत्कार सादरीकरणातून विज्ञान* कार्यक्रम पैकी काही कार्यक्रम मागील आठवड्यात झाले त्यांचे अहवाल लवकरच सादर होतील..  येत्या आठवड्यात काही कार्यक्रम होणार आहेत त्यांची ही माहिती लवकरच आपल्याला मिळेल.  

☑️अंनिसच्या कार्याची ओळख अजित  दादांच्या पत्नी शोभा डफळे वहिनींना करून घ्यायची होती त्यांचे काही समज गैरसमज त्यांना दूर करून घ्यायचे होते . ते यशस्वीरित्या माईंनी केले . अंनिसची सविस्तर समर्पक माहिती त्यांनी दिली .. माईंसोबत राजेंद्र चव्हाण यांनीही  शोभाताईना बऱ्याच माहिती पूर्ण पद्धतीने श्रद्धा आणि अंधश्रद्धा या बाबतीत प्रबोधन केले . 

माईंच्या बरोबरीने बोलणारा एक वक्ता आपल्याला मिळाला असे माईंनी उद्गार काढले ...या सोबतच  माईंनी अंनिस कार्याची चतूसुत्री आणि आपल्या आयुष्यातील अंधश्रद्धेचे लढे यांचे उदाहरण देवून शोभा ताईंना विचार प्रवृत्त केले..  

☑️ अंधश्रद्धा निर्मूलन कायदा याबाबतीत माईंनी थोडक्यात  माहिती दिली..

☑️ डफळे ताईंनी अल्पोपहार आणि चहा कॉफी देऊन सर्वांची उत्तम बडदास्त ठेवली आणि चर्चेतही सहभागी झाल्या.. 

☑️*पुढील पाक्षिक बैठकीचे नियोजन - पुढील बैठक  *19 नोव्हेंबर 2023 रोजी आपण ज्येष्ठ सदस्य आणि कार्यकर्ते पुष्पाताई तापोळे यांचे निवास स्थानी घेत आहोत.*  

 त्यांचा पत्ता खाली देत आहे..

 

अंनिस कार्यकर्ते अजित डफळे  यांचे घरी उत्तम चर्चा रंगली होती अजित दादांनी कौतुकाने आपली पुस्तके दाखवली आपले फावल्या वेळातील छंद म्हणून छोटीशी बाग जोपासली आहे . तसेच शोभा ताई आणि कुटुंब आपली सोसायटी स्वच्छ नीटनेटकी राहावी या करता खूप झटतात त्याची चिन्हे पायरी पायरी वर लक्ख दिसत होती .. आणि विशेष वयस्क लोकांना जिना उतरण्या चढण्यास सोयीचे आधाराला म्हणून जिन्याच्या भिंतीला मजबूत साखळी ही धरायला लावली आहे यातून कुटुंबाची कल्पकता आणि सहृदयता दोन्ही एकाच वेळी दिसून आले.. कार्यकर्त्या चे वैयक्तिक आयुष्यातील खूप दिवे या योगे दृश्यमान झाले . या गोड डफळे कुटुंबाला सलाम आहे 

😊🙏 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


👉 पत्ता   *19नोहेंबर रोजी होणाऱ्या बैठकीसाठी पत्ता*: 

48/104 , सुरंगी बिल्डिंग, 

वोल्टास को-ऑपरेटिव हौसिंग सोसायटी. वसंत विहार. पोखरण रोड नंबर -2  ठाणे (पश्चिम)

(वसंत विहार स्कूल आणि प्राची हॉस्पिटलची लेन ) 

 *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


🙏 *सभासदांनी कृपया वृत्तान्त अहवाल वाचून बैठकीस उपस्थिती बद्दलची माहिती खालील यादीत द्यावीत , धन्यवाद* 🙏

👉👇👇👇👇👇

मी येत्या 19 नोहेंबर 2023 रोजी,  पुष्पाताई तापोळे यांच्या कडे वसंत विहार,  ठाणे . येथे होणाऱ्या पाक्षिक बैठकीला हजर राहीन.. 


1) माई वंदना शिंदे 

2) कल्पना चेट्टियार

3) अँब्रोस चेट्टियार

4) पुष्पाताई तापोळे 

5) अथर्व लिपारे

6) 

7) 

8) 

9)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी