अंगाई

अंगाई


सोपी कशी गं चाल 

तू बांधतेस आई -२

तुज कोण शिकवितो गं 

अशी गोssड अंगाई


येता तुझ्या कुशीत 

मज सापडे गं सारे -२

तुजवीण मज ना गमते 

फुल बाग रम्य वारे 


तू मित्र माझा होशी 

माझी सखी तू आई -२

तुज कोण शिकवितो गं 

अशी गोssड अंगाई


ऐकून रम्य गोष्टी 

गीतातूनी तुझ्या गं -२

जगण्यास बळ मिळाले 

सामोरे आले जग 


प्रार्थिन मी जगाला 

लाभो तुजसम आई

तुझ कोण शिकवितो गं 

अशी गोssड अंगाई...

  *अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी