शेवटचा अंक कोणता ?

 


शेवटचा अंक कोणता ? 


सोपं सोपं हे 

कोडं सोडवा हो 

लांब कशा आता जाता 

सांगा शेवटचा, अंक कोणता तो

सांगू नका कोऱ्या बाता |


सांगा पृथ्वीच्या एकूण चकरा 

नको फुकाचा कसला नखरा 

द्याहो अज्ञानाशी नीट टकरा

चाळा विज्ञानाच्या नीट बखरा


ज्ञान विज्ञान घ्यावं समजून 

खुळ्या समजुतीच्या सोडा थापा 

सांगा शेवटचा अंक कोणता तो

सांगू नका कोऱ्या बाता |


खोला डोक्याची सारी कवाडे 

दूर राहून अज्ञान वाढे

एकमेकास सोबत घ्यारे 

ज्ञान सद्गुण सर्वास द्यारे 


आल्या गेल्याशी साथ जोडून 

एकमेका सहायक होता 

सांगा शेवटचा अंक कोणता तो

सांगू नका कोऱ्या बाता |


पाठ्यपुस्तका मित्र करावे 

ज्ञान मिळेल तिथून घ्यावे  

स्वये स्वत:स उत्तम करावे 

शिकणाराचे कौतुक करावे 


वेळ नाही हो अपुल्या हातात 

वाट उद्याची कशा पाहता 

सांगा शेवटचा अंक कोणता तो

सांगू नका कोऱ्या बाता | 


कोडे सुटले का 

तुम्हा कळले का 

सांगा कळले तुम्हा का आता 

उत्तर सोपे हो याचे उत्तर हो 

संख्यारेषा ही आहे अनंता | 

     *अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी