सीताफळाच्या रोपाने घेतला CPR .. |
सीताफळाच्या रोपाने घेतला CPR .. |
आजची पहाट विशेष आहे माझ्या आयुष्यातील !!
अगदी पहाटे पासून इतका आनंद देणारा असा दिवस विरळाच, नाहीका ? मध्ये काही दिवस खंड पडला आणि आज परत पहाटे रोपांना पाणी देण्याची संधी पाणी विभागाने दिली .. म्हणजे आम्ही धुण्याचे पाणी एक दिवस आणि पिण्याचे पाणी एक दिवस असे काटकसरीने जपून जपून पाणी भरतो आणि उरलेले सुरलेले घरातील पाणी घालून रोपे राखायची असा कार्यक्रम. असो..
..गेल्या काही महिन्यांपासून पासून आमच्या श्रीमती रोपांना पाणी घालायच्या म्हणजे त्यावेळी पाणी साधारण नवाच्या नंतर येत असे.. तर तेव्हा ही जबाबदारी तिने घेतलेली होती.. अधून मधून पाणी आले नाही तर मात्र रोपे उपाशी राहत नी मलूल पडत.
..परंतु काही महिन्यांपूर्वीपासून पाण्याने दगा द्यायला सुरुवात केली आणि सर्व चित्र बिघडले. झाले असे की पाण्याचा काही नेम राहिला नाही. काही दिवस आधी थेंब थेंब पाणी येई आणि लगेच जाई. कधी रात्री बाराला कधी रात्री दोनला कधी पहाटे पाच का असे सुरू झाले. त्यात ही प्रेशर अजिबात नाही. बाहेर जाऊन पाण्याची वाट पाहावी लागे इतरांच्या नळावर पाणी मागण्याची वेळ आली .. हा प्रकार संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर नियमित घालून त्यांना पुरावे सादर करून होईतो नाकी नऊ आले दोन महिने तसेच गेले .. पाण्याची वेळ पहाटे पाच फिक्स केली गेली.. आणि घरची पाण्याची जबाबदारी माझ्यावर मी घेतली.. असो..
...तर दरम्यान एक भयंकर घटना मला दिसली आणि मन विषण्ण झाले. झाले असे की मागच्या दोन वर्षापासून सीताफळाच्या बिया रुजवून रोपे करायची आणि वाटायची अशी गृहमंत्र्यांची हौस होती . पाण्याच्या त्रासामुळे शेवटी उरलेले एक तीन फुटी रोप होते . ते मला पूर्ण पाने सुकलेले दिसले आणि धस्स झाले.. त्याला स्पर्श करून पाहिले पूर्ण काडी कडक झालेली.. तरी उपटून टाजायची हिंमत झाली नाही. दोन तीन दिवस नियमित पाणी घालत होतो त्याला पाहून मनोमन दुःखी होत होतो.. आणि अचानक एके दिवशी त्या रोपशी बोलू लागलो त्याला विनवू लागलो की रुजून ये रे बाबा प्लीज. अगदी मैत्री केली आणि रोज पाणी देऊन बोलत राहिलो ..
.......गेल्या आठवड्यात मात्र पाण्याचा खाडा सलग दोनतीन दिवस झाला.. प्रेशर कमी त्यामुळे नंतर उरलेले पाणी घालू असे विचार करत राहून गेले होते . इतर रोपांची पाने मलूल होत होती गृहमंत्री बोलत होते . आज पहाटे पाणी घालायला गेलो तर काय आश्चर्य मुळापासून फुटभर हातापर्यंत कैस पोपटी हिरवी पाने हसत उभी होती .. आणि मी सर्व पाणी मारून परतताना त्या रोपाला पाणी घालून बोलायला गेलो तर मला ती पाने दिसली आणि मी किंचाळायचाच शिल्लक होतो.. आनंदाला आता पारावर राहिला नाही.. कधी जाऊन बायकोला ( अर्थात वर गृहमंत्री असे संबोधन केलेल्या माझ्या बायकोला )सांगतो असे झाले होते . तिला सांगितले .. झाले . आता तुम्हाला सांगितले .. नी माझं दिवस करणी लागला... त्या सीताफळाच्या सुकलेल्या रोपाने मी दिलेला प्रेमळ CPR घेतला बरं. याचा मला कोण आनंद !!! ...
...आणि हो ह्या एक तारखे पासून दैनंदिनी लिहिण्याचे घाटत होते तो आज लिहायला विशेष कारण ही मिळाले.. नक्की तुमचे अनुभवही कळवा . रोप वृक्ष आणि हिरवाई हा आपल्या सारख्या काही लोकांचा जीव की प्राण असतो नई . तेवढे मिळाले की बास !!.. दुसरे काहीच नको असते..
*अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा