प्रौढ आणि वयस्क व्यक्तींनी खास करून महिलांनी नाचून गाऊन reels बनवले तर लोक काहीबाही बोलतात.. हे चूक आहे ..आपले संस्कार आणि अमानवीय असंस्कृत विचारच दर्शवते ते ... असो
विषयंच वेगळा आहे हा...
दिसते आहे त्या मागे खूप काही वेगळेच दडले असू शकते ...
...दोघे वयस्क पती पत्नी आपल्या भयंकर व्यस्त आयुष्यात मुलांकरिता सर्वस्व वेचून दमले तारुण्य संपले .स्वतः करिता जगायचेच राहून गेले ..
...आता सुदैवाने दोघेही साधारण चालते फिरते , आरोग्य पूर्ण आयुष्य जगत आहेत . तेव्हा आपले गाण्याचे वगैरे सारखे छंद पूरवताहेत .. आणि योगायोगाने मोबाईल्स आणि सोशल मीडियाचा जमाना ही आहे ..
..तेव्हा सुरुवातीला कुणीतरी सोशल मीडिया वर त्यांची पोस्ट केली आणि viral झाले हे जोडपे.. .. दोघांना एक नवीन विरंगुळा मिळाला ..
.. पण विषय न समजून घेता आपण प्रत्येक गोष्टीत आपल्या पूर्वग्रह दूषित दृष्टीने पाहून व्यक्त होतो तसे करू नये ..
तर विषय वर सांगितला तसा आहे..
.... हे जोडपे स्वतः जगण्यातला आनंद शोधत आहेत आणि इतरांनाही जगण्याची प्रेरणा देत आहेत . ही चांगली गोष्ट आहे मात्र आपल्या कडे कळायला अजून काही दशके वा शतके ही लागू शकतील का ?? .. लहान मुले samjhdar ahet ..pn aplya वयाची ५० च्या आसपास आणि पुढची म्हणावी तेवढी प्रगल्भ नाहीत .. आणि आश्चर्य म्हणजे तरुण मुलेही अशी कोत्या विचारांची होत आहेत म्हणजे संस्कार योग्य होत नाहीत .. आपल्या पालकांच्या जागी ठेवून पाहावे म्हणजे थोडे उदारपणे comments येऊ शकतील.. असो..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा