एक प्रश्न
एकच प्रश्न पडतो की ... ह्यांचे अंतिम ध्येय काय असेल बरे ?
ज्या आपल्याच भूमीत (जर हे खरे असेल) तर युगपुरुष साक्षात भगवान श्रीकृष्ण सुद्धा लयाला जातो. त्याची वंश पालक द्वारका होत्याची नव्हती होते. तिथे सामान्यांची काय कथा..
जिथे प्रत्यक्ष थोरल्या महाराजांनी आपल्या ह्या बांधवांना डोळ्यात अंजन घालण्याच्या मिशाने तीन तीन वेळा अद्दल घडवावी लागते तरी आज ही शेपूट वाकडे का ? ..
की त्याचा बदला म्हणून आज मुंबई महाराष्ट्राचे वैभव पळवून आपले घर भरत आहेत ?? .. मग तो परदेशी गझनीच्या महमूद काय वेगळा होता ? की त्याचेच वंशज हे.. चुकून सोडून गेलाय तो....hmm ????
युगानुयुगे गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या भूमीवर आपल्या भारताच्या नागरिकांना एक नाही तर एक बाह्य शक्ती पोटात शिरून आतून पोखरून त्रस्त का करत असेल बरे ? आपलेच लोक , लोकांच्या विचारांना कसे व का बळी पडत असतील बरे ? आणि अंती आपल्याच बांधवांना आपण कसे काय इतके नाडू शकतो? हे असले कसले खूळ आहे जे आपसातच श्रेष्ठत्व सिद्ध करायची खुमखुमी निर्माण करते आणि त्या साठी आपल्याच लोकांच्या अस्तित्व, स्वाभिमान वा जिवाचीही परवा करीत नाही ???? नक्की हे आपलेच बांधव का ? असा विचार मनात येतो नी खूपच खिन्न व्हायला होते..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा