आजच्या तरुणाईतील सच्च्या शिक्षकास !


तुझियात पाहतो मी मज मीच हे सख्या रे 

तो डौल तो निवारा स्वच्छंद जागणारा 

हरखून सौख्य पावे पाहून तुज समक्ष 

तुझियात पाहतो मी मन मीत जोडणारा


नावारूपास आले जे कार्य सुप्त होते 

पाहावयास कोणी तेव्हा न जाणणारा

तू आज घेशी कष्ट पेरावयास जे जे 

मज आठवे तो काळ होता किती तो धृष्ट

नेटास को विचारी स्वार्थांध भूक मारी 

कार्यास तो कठीण होता उधाणवारा


तो काळ वेगळाला आज काळ वेगळाहे 

कार्यात ना कसूर ना कमतरताही होती

यंत्राची साथ नव्हती तंत्राची साथ नव्हती 

पायी प्रवास सारा कैकैक कोंडमारा

तरी आजचे तुझे हे मानेन मोठे कार्य 

कार्यात तू स्वच्छंद आनंद जगवणारा


अगदी तुझ्यासम होतो कार्यात डुंबणारा

मज वेड ते नव्याचे प्रकृतीस जागणारा

तुजलागी गुण तो पाही रमतोस तू मुलांत

आधार प्रकृतीचे फोफावती हास्यात 

सर्वांस नाही जमणे रमणे बिंजांकुरात 

संस्कार भूतदयेचा फुलवीत प्रकृतीस 


आहे अताशी एकच मज सांगणे श्रृणावे

हिंसेस त्यापुरोनी अहिंसेस जागवावे, अहिंसेस जागवावे |

      *अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी