उपलब्ध साधन साहित्याच्या आधारे आपल्याला सहज कळते की मुळात
       आपण उद्यमी, उद्योगशील होतो. उद्योगातून आपला नफा करून घेणे हे काही चूक नाही.. आपले कार्य कुशलतेने करणे हा आपला जीवनाचा भाग होता. आपण लोकशाही वृत्तीचेच होतो. सर्वांना मोकळीक होती.. कोणाला आडकाठी करणे वगैरे रक्तात नव्हते. खूप सरळ सोट असे जीवन आपण विकसित केलेल्या अनेक गोष्टी आणि ज्ञानाचे बळावर आपण आपल्या भरत खंडावर जगत असू ..
...पण ... बळकावयाचे आणि लाज ही वाटून घ्यायची नाही ही आपल्यात नसलेली वृत्ती असलेली मंडळी आपल्या कडे भीक मागत, आश्रयाला आली, येत गेली आणि हळू हळू घर पोखरू लागली त्यांना हवे असलेले पेरू लागली आणि आपले ज्ञान चोरू लागली. आपली भाषा आपले परंपरागत वर्तन हीन ठरवू लागली आणि भोळे पणाने आश्रीताला डोक्यावर घेऊन आपल्याच घराची मेढे आपण कापू लागलो. आपल्याच व्यवसायात नको तेवढा अमानुष गैरव्यवहार करून घेऊ लागलो . हे सर्व अनैतिक कार्य शिकवणारेच बेमालूम आपली रीतसर बदनामी करून करवून आपल्याला हव्या त्या जाळ्यात गुंतवू लागले .. तेच बारा गावचे पाणी पिवून आलेले लोक जातील तेथे आपली बदनामी करण्यास कुचराई करत नव्हते .. आल्या गेल्या शासकाला हे सर्व कळू नये वा येथील मूळनिवासी जनतेला समजू नये म्हणून जनतेचा संपर्क प्रत्यक्ष संबंध पद्धतशिर पणे खंडित करण्यात आला. आणि जिकडे तिकडे मुख्य पदांवर तेच असून होत गेले. ज्ञानापासून वंचित करून फक्त कौशल्यसंबंधित कामे आणि हळू हळू श्रेष्ठ कनिष्ठतेची उतरंड घट्ट केली गेली. सर्वाधिकार  दृश्य अदृश्य स्वरूपात त्यांच्याच हाती कसे राहतील याची चोख व्यवस्था राखली गेली. मूळनिवासी कर्मानुसार विभागले गेले इच्छे नुसार विभागले गेले उपयुक्ततेनुसार विभागले गेले.. 
...आपण अंतर्मुख होतो आपण कुशल होतो आपण कल्पक होतो आपण प्रचंड मेहनती होतो. आपण ज्ञानी होतो. आपण फक्त आक्रमक नव्हतो आपण मनुष्य द्वेष्टे नव्हतो. आपणा कुटिल नव्हतो कपटी नव्हतो.. स्वार्थी नव्हतो.  म्हणून आपण ह्या कपटी, कुटिल लोकांपुढे जागरूक राहण्यात कमी पडलो. त्यांच्या गोडबोल्या अहंगंड पोषित बुद्धी विचार तंत्रा पुढे आपण गाफिल राहिलो. परिणामी आपण तत्कालीन मूळ भारतीय निवासी बदनाम आणि गुलाम झालो, होत गेलो.. त्यांच्या कात्रीत अडकलो.. त्यांनी आपले सर्व ज्ञान, कौशल्य, भाषा, साहित्य, रचना  सर्व सर्व काही लाटले... आपल्या नावावर लेखले लांबवले. आपल्या लिखित ज्ञानाच्या आवृत्त्या करत करत भाषेत सुधार वा बदल करत करत आपले असे साहित्य तेही जणू मूळ की काय असे संकलन करत जात ते मर्यादित केले. तत्कालीन भाषेत न लिहिता तत्कालीन सामान्य जनतेस उपलब्ध न होऊ देता चोरून बंदिस्त केले .. आणि येणाऱ्या  पिढ्यांना जणू काही आपलेच ज्ञान हे मूळ आणि पुरातन वगैरे भडवण्याचे कारस्थान रचले . आणि हळू हळू आपल्या जल जंगल जमिनीवर कब्जा करायला सुरुवात केली ती आजतागायत सुरू आहे .. विचार करा  म्हणजे .. असे उपलब्ध ज्ञानावरुन सहज समजेल ...
   ....      मात्र तो कपटी ढोंगीपणा स्वार्थी अनैतिक भ्रष्ट गुण आपल्या लेखी देवलोकातून आलेल्या देवांनी आणला त्याला मुलामा दिला गेला... साम दाम दंड भेद आदी  गुण म्हणून प्रतिष्ठित केले गेले.. पद्धतशीरपणे  आपल्याला फूट पाडून आपल्यातीलच तथाकथित राक्षसांना हरवणारे पुरुषार्थ, मुत्सद्दीपणा, मानवता धर्म अशा नावाखाली आपल्या मेंदूत आणि पेशी पेशीत वगैरे घट्ट बसवले आहे ..वेळोवेळी हे हेरून ह्यातून स्वजनांना तसेच आप पर भाव न मानता उद्दत्त भावाने तमाम मानवतेला बाहेर काढण्यासाठी आपल्यातील कितीतरी विभूती आल्या, आयुष्य वेचून झटल्या. त्यांच्या उपस्थितीत ते ही ज्ञान ग्रहण करून पचवून त्यांच्या पश्चात त्यांचाच ज्ञानाला मुलामा देऊन आपले म्हणून प्रसारित करायचे आणि  त्यांचे पुढारपण  काढून घेण्याचा कुटिल डाव येथे अनंत वेळा खेळला  गेला आहे .. व सतत आपले वर्चस्व कसे राहील हीच एक क्षूद्रबुद्धी वर्चस्वा करिता सामान्याला दाबत आली आहे.  हे सर्व नीट समजून घेण्यासाठी खूप चांगली समज येणे आणि जागृती आणि प्रबोधनाकरिता अविरत आणि पद्धतशीर , तसेच कठोर नियमबद्ध कार्य होणे आवश्यक आहे.. 
.... आणि हे सध्यातरी स्वप्नवत आहे ...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी