लक्ष्य !
तुमचे लक्ष्य काय आहे ?
तुमचे ध्येय काय आहे ?
तुमचा मार्ग कोणता ?
स्वतालाच हे प्रश्न विचारा
उत्तर जाणा काय आहे ?
होताच चुळबुळ कुणाची
का तुम्ही अधीर होता ?
होताच खुडबुड कोठे
का तुम्ही बधीर होता ?
लक्ष्य तुमचे विसरून जाता
त्यांचे दुःख मोजीत बसता
ध्येय तुमचे दूर जाते
वाट पुन्हा शोधीत बसता
हा प्रस्थापितांच्या बनाव आहे
माना वा प्रकृतीचा खेळ आहे
तुमच्या प्रगतीस खीळ बसविण्याची
सारी ही तडजोड आहे
हळहळून विसरावयास लावतात दुःख आपले
पुन्हा नवेच पिल्लू आणून सोडती कसायापुढे
खेळ त्यांचा अनवरत चालतो नी जातो पुढे
ध्येय तुमचे थबकलेले ते पहा मागे कुठे
एक त्यांचे ध्येय तुम्हा थांबवावे गंजवावे
पण तुम्ही ध्यानात नाही घेत याचे बारकावे
काहीही घडो अगर वा पडो कशाची आहुती
थांबवाया जाणे जरुरी असा सदैव सामोरे पुढती
एकदा का तुम्ही पोचला त्या तिथे ध्येया कडे
मग तुम्हाला हेच येतील घालतील जी साकडे
पण तुम्ही व्हा ठाम पुन्हा म्हणा बधणार नाही
गमावले ते सारेच आता मिळवायचे आहे काही
*अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा