*वृत्तान्त विशेष*
म.अंनिस मुंबई आणि ठाणे शाखा पुस्तक विक्री स्टॉल
आणि चमत्कार सादरीकरण कार्यक्रम |
स्थळ: गोरेगाव पश्चिम, मुम्बई.
दिनांक : 24 डिसेंबर 2023
वेळ : 3 ते 8:30

    अ. भी. गोरेगावकर, इंग्लिश स्कूल, गोरेगाव, मुंबई, शाळेच्या पालक संघटना  'अभिमान मित्र परिवारच्या अत्यंत प्रेरक आणि स्तुत्य अशा  *मराठी शाळा बचाव*  मोहीमेतर्फे आयोजित खाद्य पदार्थ विक्री आणि वस्तू विक्री तसेच विविध कला, कौशल्य प्रदर्शन आणि जाहिरात. अशा त्रीदिवसीय जत्रेत सालाबाद प्रमाणे अंनिस मुंबई शाखेच्या पुस्तक विक्री स्टॉल सोबत अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर शाखेने चमत्कार सादरीकरण प्रबोधन कार्यक्रम विशेष उत्साहाने सादर केला.

स्टॉल आणि चमत्कार प्रात्यक्षिक सहकारी अंनिस कार्यकर्ते,
आणि गायन चमू.
लांजेकर सर
माई वंदना शिंदे
शुभदा निखारगे ताई
नितीन सुतार
अजित डफळे
पुष्पाताई तापोळे
प्रा.पारखे सर (आकाश दर्शन)
कल्पना आणि अँब्रोस चेट्टियार
चळवळ गीत समूहातील young minds
दीपा, मीनाक्षी, यश, निखिल , तनिष्का, श्रुतिका, पलक, नियती , हर्षल, अरमान-(अधांतरी बाबा)
    अंनिसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडत ग्राहक नागरिकांना,  स्टॉल लावताच सर्वप्रथम अंनिस बद्दल आणि पुस्तकांबद्दल माहिती देण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला . माईंनी स्टॉलवरून येणाऱ्या जनतेला, मुलांना चमत्कार प्रात्यक्षिके दाखवीत त्यांचे प्रबोधन होईल असे छोटेखानी व्याख्यान रूप संवादात्मक स्वरूपात त्यांच्याशी चर्चा केली ..
   त्यानंतर या वेळचे खास आकर्षण म्हणजे अधांतरी बाबा हा स्टेज एरियात घेण्याची विनंती आयोजक मंडळातून केली गेली..आणि बाबांची तेथे स्थापना केली. माईंच्या पुढाकाराने अधांतरी बाबाच्या तयारीची पूर्तता झाली होती. आणि गायन चमुच्या एक सदस्य मुलाने बाबा म्हणून तासभर चुळबुळ न करता बसण्याची तयारी दर्शविली आणि तसा तो बसलाही.. त्या प्रात्यक्षिकाने वातावरण गंभीर बनले होते. अनेक जण कुतूहल आणि औत्सुक्याने पाहायला येत होते. नकळत काही हात जोडले जात होते..मला आपला विद्यार्थी एक मोठे कार्य पार पाडत आहे हे पाहून भरून येत होते, खूपच लोभस दृश्य ते भासत होते.. .....विशेष म्हणजे नव्या दमाच्या छोट्या विद्यार्थ्यांनी चळवळगीतांतून प्रबोधन हा कार्यक्रम सादर केला. त्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणात कोणताही व्यावसायिक गुण दिसला नाही. खूपच नवीन शिकाऊ हौशी आणि किशोर आणि कुमारवयीन मुले ती आहेत.. चौफेर खुल्या रंगमंचावर घोळका करून mike पर्यंत आवाज पोचविण्याचा प्रयत्न निरागसपणे करत सादरीकरण मात्र तितक्याच दमदारपणे केले.. *शब्दातून चळवळ पोहचविण्याची ताकद असलेले आपले अंनिसचे प्रेरणास्रोत माननीय, आदरणीय, शाहीर एस एस शिंदे सरांची* सार्थ समर्पक विषयानुरूप आकर्षक आणि अनुकरणीयगीते लहानग्या मुलांनी उत्साहाने सादर केली.. याचे श्रेय त्या गीतांच्या मर्मभेदी रचनेलाच जाते. शाहीरांना सलाम आणि मानाचा मुजरा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुरुवातीला एकदा गायन चमूने सादरीकरण केल्यानंतर सायंकाळी 7: 45ला पुन्हा एकदा संधी देण्यात आली होती. आणि चळवळ गीतांनी वातावरण पुन्हा एकदा बदलून टाकले. या वेळी मात्र गीतगायन संपन्न होताच आयोजकांनी रंगमंचावरून उतरलेल्या गायन चमूला खास बोलावून. चमुची संकल्पना मांडण्याचे आवाहन अँब्रोस यांना केले त्यांनी ते थोडक्यात मुलांचा गीते गाण्यासाठीचा उत्साह अशा शब्दांत मांडले त्यानंतर माईंनी अधांतरी बाबा ह्या चमत्काराबद्दल विचार मांडले. आयोजकांनी ह्या विशेष सादरीकरणाचे कौतुक केले आणि पुष्पगुच्छ देऊन गायन चमुचा  पर्यायाने अंनिसच्या कार्याचा गौरव केला .. या समुहाला सन्माननीय भारतीय राष्ट्रीय चिन्ह,  स्मृतिचिन्ह म्हणून  भेट प्रदान करून ह्या छोट्याशा प्रयत्नाचा यथोचित गौरव करत त्या विशेष क्षणांचे सोने केले...
    ...सोबत आणलेल्या या मुलांना सादरीकरणाव्यतिरिक्त जत्रेत कल्पना यांच्या कडक आणि तितक्याच मायाळू देखरेखीत मनसोक्त फिरता आणि विविध खाऊ खाता आले .. *त्याची तशी सोय केली गेली होती.. आणि मग आकाशदर्शन ही करता आले होते.. दरम्यान आणि नंतर दुसरीकडे मोकळ्या मैदानातील भागातील दुर्बीण सज्ज करून पारखे सर लोकांना रांकेने चंद्र , चंद्रकला यांचे दर्शन घडवत होते. पुढे चंद्राशेजारीच गुरू आणि थोड्या अंतरावर शनी असे ग्रह ही उदित असल्याने ते ही थोड्या अंतराने टिपून दुर्बीण सज्ज करूंन त्यांचे दर्शन घडवित होते.  अशा प्रकारे जत्रेतील हा दिवस भरगच्च कार्यक्रमाचा उत्साहाचा आणि आनंदाचा होऊन गेला..
म.अंनिस अहवाल..23डिसेंबर23
वृत्तांकन : अँब्रोस चेट्टियार.
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी