भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मृतींना वंदन
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात आपले अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच स्वातंत्र्य संग्रामातील गांधी नेहरू यांनी विचारपूर्वक पकडलेले अंगिकारलेले भगवान बुद्धांचे सूत्र, महात्मा ज्योतीबांचे चौफेर मार्गदर्शक क्रांतिकारी तत्व, आधुनिक विचारांची लखलखीत जागतिक बैठक आणि बाबासाहेबांच्या, दलीत समाजाला एकत्रित ठेवण्याच्या प्रयत्नांच्या प्रक्रियेतील साम्यवादी विचारांच्या एकत्र वाटचालीमुळे तात्कालिक क्रांतिकारी बदल दिसून आले.. पण साम्यवादी लोक विभूती पूजेस नाकारून विकासाच्या शक्यत्या सर्व वाटा चोखाळण्याचे कसून प्रयत्न करतात. अर्थात तसे व्हावे हे अपेक्षित . पण तिथेच नंतरच्या काळात अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.. आणि त्याचा फायदा अर्थात नेहमीप्रमाणे टपून बसलेले न चुकता घेतात आणि ते आज समाज कुठे घेऊन चालले आहेत याचे डोळसपणे अवलोकन केले तर असे दिले की .... बहुसंख्य समाजाने काहीच विचार करण्याची तसदी न घेता आपले दावे त्यांच्या हाती देऊन अविचारी निश्चिंत पत्करली आहे ..
आज आपल्या स्मृती दिनी बाबा मी हे आपल्या समोर मांडतो आहे आणि विचारतो आहे की जिकडे तिकडे प्रखरतेने मांडले जाणारे तुमच्या मनातील म्हणून मांडले जाणारे काँग्रेस आणि गांधी नेहरू यांच्या विरोधातील विचार आजच्या संदर्भात ही समाजाच्या फायद्याचे आहेत का आणि ज्या विचारांच्या विरोधात एकूण सामाजिक क्रांती झाली त्याच विचारांनी आज समाजाला पूर्णतः वेढलेले दिसत असतानाही गांधी नेहरू ने त्याकाळी साम्यवादाचा बोलबाला असतानाही  (मात्र नंतर साम्यवादी विचारांची फारशी चांगली अवस्था जगात,  कोणत्याही खंडात, एकंदरित देश चालविण्याच्या दृष्टीने राहिली नाही ) तुम्हाला सोबत घेऊनही समतावादी, समाजवादी लोकशाहीचा बिगुल का फुंकला असेल ? हे तुम्हीच तुमच्या शब्दात सांगायला आज हवे होतात बाबा..
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी