का नेहरू गांधीची बदनामी लोक करतात ? 


       नेहरू गांधी इंदिरा आणि काँग्रेस यांची कमाल बदनामी करणे हाच कार्यक्रम काही चोरांच्या आयुष्याचे इतीकर्तव्य असावे असे तेच सिद्ध करत असतात.  

काश्मीर प्रश्न नेहरूंमुळे ? 

मात्र सत्य हे आहे की काश्मीर भारतात आहे तोच मुळात केवळ नेहरूंमुळेच हेच लोकांना माहीत नसते आणि हे सत्य  कागदो पत्री पुराव्यांसहित अभ्यासाकरिता जागतिक पटलावर उपलब्ध आहे..  पण ते सर्वश्रुत होत नाही.. लोकांना याच्या उलट माहिती असते.  असे का बरे ??  

याचे कारण काही लोकांना सर्वसामान्य जनतेला  खरे ज्ञान होऊच द्यायचे नसते ... असल्या लोकांचे पालक जे मागची पीढी असल्याने  जनतेत गैरसमज पसरवण्यास सहजच उपलब्ध साधन बनतात,  जे मुळात खरे ज्ञान घेण्यास विशेष उत्सुकही नाहीत आणि ज्यांना काहीच संशोधन, चौकशी, अभ्यास करायचा नसतो. असे आळशी म्हणा, असे बळी पडणारे लोक, जे सहज हे अमानवीय असामाजिक कार्य कळतनकळत करण्यास सहज तयार वा उपलब्ध होतात.  त्यांच्याच कडे असले नेहरू गांधी विरुद्ध गैरसमज निर्माण करणारे प्रसंग आणि त्या बद्दल त्यांना जाब विचारणारे प्रश्न,  पढवलेले मुर्ख प्रश्र्न असतात आणि एकामागून एक प्रश्न विचारण्यातच फक्त ते धन्यता मानतात त्या वरील उत्तरांमध्ये त्यांना रसच नसतो किंवा प्रश्न विचारल्यावर त्यावर काही उत्तर असते, ते ऐकायचे असते, अशी सभ्यता असते हे पद्धतशीरपणे, चतुराईने, स्वार्थप्रेरित विचारांनी मुद्दाम विसरले जाते. पुढे ते उत्तर समजून घेऊन आपल्यी विचारांची दिशा ठरवायची असते, असा काही चर्चेचा संकेत असतो हेच गावी नसल्यासारखे वर्तन ते करतात.   आणि अर्थात हे सर्व पद्धतशीरपणे आखून दिलेल्या कार्यक्रमाबरहुकूम पार पाडण्यासाठी मोठी आर्थिक मदत पुरविणारी टोळी असते , आणि त्यांच्या द्वारे ह्या कार्यासाठी मोठी पगारी फौज समाजात विविध स्तरावर स्वार्थासाठी अविरत तयार केली जात असते. सहभागी लोकांना  त्यात स्वार्थसिद्धीची विशेष टक्केवारी ठरवून दिलेली असते.  त्याउप्पर आपल्या विशेष क्रूर कौशल्याने सामान्य लोकांना अंकित ठेवताना आवश्यक तेवढे बेमालूम नाडायचे स्वातंत्र्यही अलिखित कराराने जणू दिलेले असते.  म्हणूनच तर हे स्वार्थी लोक ज्यांना ह्या काळया कर्मातून अशी अर्थप्राप्ती होते ते तर अगदी जीवतोड तुटून पडतात हे खोटे मुद्दे मांडताना..

परंतु सत्य शेवटी सत्यच असते .. नेहरूंनी अशी काही जबरदस्त पाचर इतिहासात,  भारतीय स्वातंत्र्य काळातील, आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील व स्वातंत्र्योत्तर देशबांधणीच्या प्रचंड कार्याने  मारून ठेवली आहे की ती पाचर जरा जरी हलवली की त्यातून सर्वच्या सर्व पुरोगामी, समाजवादी, लोकशाहीवादी, मानवतावादी, भारताचे सर्वच्या सर्व नेते आपले जाज्वल्य देशाभिमान आपल्या सक्रिय क्रांतीतून धडे देत बाहेर पडतात आणि सर्वांच्या पुढे अंत्योदयाची धुरा वाहताना चटकन गांधी बाहेर पडतात आणि सर्वांचे पुढे प्रचंड वेगाने जलद गतीने पुढचा मार्ग आक्रमतात.  कारण त्या जंतेसोबत जनतेसाठी चालण्याला जनहिताचे मोठे अधिष्ठान प्राप्त झालेले असते म्हणून ते लगबगीने लोककल्याणासाठी आपले स्वताचे सर्वस्व त्यागून पुढाकार घेतात ... आणि नेहरू मात्र यत्र तत्र सर्वत्र सर्वांसमवेत अगदी एकरूप होऊन येतात.. आणि पाचर हलवणाऱ्यास धडकी भरते ..आणि तो काहीही बरळू लागतो... पण ज्यांच्या इतिहासाचे अध्ययन करण्याशी काहीच संबंध नाही असे निष्क्रिय आणि देशजनांबद्दल काहीच सोयर सुतक नसलेले हेरून काढून वा घडवून त्यांच्या हाती ह्या पुड्या दिल्या जातात की गांधी नेहरू इंदिरा असे तसे तू.हला तर काहीच माहीत नाही वगैरे ...

त्या मुर्खांना माहीत नाही ... त्या काळी त्या लोकांनी आपल्या हुशार चाणाक्ष दूरद्रष्ट्या पूर्वजांनी चांगली मळून तयार केलेली वाट चोखाळलेली असते.. त्यांनी सर्व मानवता वादी विचार सर्वप्रथम जनतेशी संवाद साधून जनतेकडून वदवून घेऊन समजून घेऊन मगच त्यामार्गावर पाऊल टाकलेले असते ते पदरचे जे काही सांगायचे असते ते सर्व त्रिकालाबाधित कसावर घासून घेऊन सांगत असतात .. आणि ते स्थानिक ते राष्ट्रीय पासून जागतिक मानसपटलावर कायमचे कोरून जातात.. मग ते सहज सहजी कसे इतिहासातून पुसले जाईल ? मग चोर सत्ता हस्तगत करून इतिहासाच्या पुस्तकांतून ते सर्व पुसण्याचा क्रूर प्रयत्न करतात... त्या प्रयत्नांची परिणतीस्वरूप खूप पडझड होऊन समाज खूप मागे जातो...  समाजाचा एक भाग जो मूळ स्थानिक असेल, जगण्यासाठी ज्ञान प्राप्त करू इच्छितो त्याला ज्ञानापासून वंचित ठेवायचे आणि त्यांना समाजात काडीचीही किंमत द्यायची नाही त्यांना अंकित करण्याठेवण्यासाठी त्याउलट समाजाचा दुसरा एक मोठा भाग वैचारिक दृष्ट्या मात्र मुद्दाम मागास, ठेवला जातो आणि त्याला नेहमीच खोटे अभिमानी पुढारपण पाहिजे असते.  मग ते मिळवायचे कसे ? तर साम दाम दंड भेद आणि तत्सम कार्यांची पुनरुक्ती साधत. वातावरण निर्मिती करत जनमानसावर आपले घाणेरडे गलिच्छ विचार लादत राहायचे आणि त्याच्या परंपरा निर्माण करायच्या... जेणे करून पिढ्यांपिढ्यांना आपल्या सेवेत बेमालूम रुजू ठेवण्यास सोयीचे जावे.. आणि जिकडे तिकडे आपण कसे वंशाने, कुलाने श्रेष्ठ आहोत मग सगळे काही कसे आमचेच असणार त्यावर इतर कुणाचा हक्क कसा राहणार नाही अशा त्यांच्या बिनबुडाच्या कथा प्रसृत करून जनमानसात सतत एक असुरक्षिततेची टांगती तलवार ठेवून सतत सामान्य जनता कशी ह्या दबावाखालीच राहील ह्या साठी माणसे नेमली जातात त्यांना अर्थात त्यांची दलालीची टक्केवारी ठरवून दिलेली असते.. अशी निर्बुद्ध आणि शाश्वत पोटापाण्याची सोय असेल तर कोण कशाला धडपड करेल ?? पण सच्च्या माणसाला असे फुकटचे खाण्यात रस नसतो, तो माणुसकीचा, सत्याचाच मार्ग चोखाळतो आणि माणसासाठी तो मानवतेचा मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न करण्यात धन्यता मानतो ... 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी