भरकटलेपण ! 


किती भरकटलोयत आपण 

कुठेही भेलकांडत उडत चाललेल्या,

कटलेल्या पतंगासारखे....

वारा वाहायची खोटी, फडफड सुरू..

दिशाहीन फडफड, गंतव्यहीन उड्डाण...

स्वाभिमानहीन झेप, क्रूर अमानुष चरणात..

विसरलोयत आपले सामर्थ्य, उखडून टाकण्याचे 

क्रुरतेसह त्या चरणांना..

आणि झालोत अगतिक नको त्या पायांशी..

आपल्या सामर्थ्याला नकळत वेसण घालण्यात आली आहे 

ध्यानात येऊ नयेत इतके बेमालूम कोश विणलेत, 

ते ही स्वहस्ते आपले आपणच..

इतके अमानवी यांत्रिक प्रशिक्षण अगदी गळी उतरवले....

आणि मेंदूत भिनवलेयत

आणि तेही विना संघर्ष, नाही का ?

काय ते कौशल्य ! आहात कुठे ? 

खूपच भरकटलोयत आपण...

उठा जागे व्हा, आता तरी..

आपली जबाबदारी ओळखा आता तरी..

   *अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी