वृत्तांत : 

वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन कार्यक्रम, 

NSS विभाग ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे..

स्थळ : वाजे गाव, नेरे , पनवेल . 

दिनांक : 14 डिसेंबर 2023

वेळ : 12 ते 2 


ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे NSS विभाग प्रमुख बाबासाहेब कांबळे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वैज्ञानिक जाणिवा प्रबोधनाचा सप्रयोग कार्यक्रम सादर करण्यासाठी अंनिसच्या  ज्येष्ठ कार्यकर्त्या माई वंदना शिंदे यांना वाजे गाव पनवेल येथील शिबिर स्थळी, जिल्हापरिषद शाळा वाजे येथे आमंत्रित केले होते. 

  

      साधारण दीड ते पावणे दोन तासांचा  प्रवास करत माई आपले सहकारी कार्यकर्ते अजित डफळे आणि अँब्रोस चेट्टियार यांचे सोबत कार्यक्रम स्थळी पोहोचल्या आणि आगत स्वागत झाल्यानंतर लगेच कार्यक्रम सुरू केला गेला.. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस प्रमुख कांबळे सर यांनी केले आणि स्थानिक शाळा मुख्याध्यापक नीलकंठ भुरे सर यांनी अंनिस कार्यकर्ते  माई वंदना शिंदे , अजित डफळे आणि अँब्रोस चेट्टियार यांचे विद्यार्थांनी बनवलेल्या हस्तकला साहित्याने स्वागत केले.   अँब्रोस यांनी अंनिसची थोडक्यात ओळख आणि माईंची ओळख करून दिली आणि माईंनी सप्रयोग व्याख्यानास सुरुवात केली. 


विद्यार्थ्यांचा सहभाग घेत माईंनी रिकामा दिवा पूर्णपणे तपासून घेतला आणि पाण्याने भरवून घेतला. पाण्याचा चमत्कारिक दिवा मुख्याध्यापक नीलकंठ भुरे सर यांच्या हस्ते प्रज्वलित करून माईंनी व्याख्यानास सुरुवात केली ... त्यानंतर अंनिस जागृती आरती घेतली.  मुले आणि प्राध्यापक , शिक्षक वर्ग कुतूहलाने कार्यक्रम समरसून पाहत, अनुभवत होती. माईंनी भूत पकडणे ,  भुताटकी , अंगात येणे,  नारळातून करणी काढणे इ. प्रयोग दाखवले. अंगात आल्यावर कापूर खातात हा प्रयोग माईंसोबत  मुलांनीही करून पहिला . त्यानंतर 250 अणकुचीदार खिळे असलेल्या खिळापाटावर झोपण्याचा प्रयोग दाखवताच अनेक मुला मुलींनी ही तो प्रयोग करून पाहण्यात रस दाखवला ..  सर्वांना आश्चर्यचकित करून सोडणाऱ्या कार्यक्रमापैकी करणी काढलेल्या मुलीचे कार्यकारण भाव समजाऊन सांगेपर्यंत आश्चर्य आणि गोंधळ होऊन तिच्या प्रश्नांना उत्तरे देणे हा भाग सर्वांसाठी ज्ञानवर्धक आणि प्रेरक ठरला होता. सर्वच प्रश्नांची उत्तरे देताना त्यामागील विज्ञान माई समजाऊन सांगत होत्या आणि त्यास पूरक आणि समयोचित चळवळीची गाणी अँब्रोस यांनी घेतली.  सर्व चमत्कार सादरीकरणात सदैव तत्पर अजित डफळे यांनी मोलाचे सहकार्य दिले..  शेवटी अंनिस वार्तापत्रा बद्दल माहिती देत सभासद होण्याचे आवाहन अँब्रोस यांनी केले आणि आपला कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले..

या कार्यक्रमास आयोजक संघातील अनेक कार्यकर्ते प्राध्यापक प्राध्यापिका जि प. शाळा मुख्याध्यापक भुरे सर त्यांच्या शाळा शिक्षिका आणि सुमारे ७५ विद्यार्थी विद्यार्थिनी, सुमारे ७० महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी अशा सर्वांनी कार्यक्रम उत्साहात उपस्थिती राखली होती.. 

कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला असे ग्वाही देत.. कार्यक्रमाचे आयोजकांनी आभार व्यक्त केले.  त्यानंतर दुपारच्या भोजनोपरांत आयोजकांनी अंनिस कार्यकर्त्यांना निरोप दिला. 

वृत्तान्त : शब्दांकन अँब्रोस चेट्टियार

*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर शाखा.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी