वृत्तांत : 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

चमत्कारातून वैज्ञानिक प्रबोधन 

स्थळ : बामणे गाव, शहापूर, ठाणे.

दिनांक : 28 डिसेंबर 2023


R J Thakur College, Thane चे NSS कॅम्प बामणे गाव शहापूर येथील शाळेत आयोजित होता. ज्येष्ठ कार्यकर्त्या माई, वंदना शिंदे यांना चमत्कारातून वैज्ञानिक प्रबोधन करण्यासाठी आवर्जून बोलावले होते. माईंनी नेहमी प्रमाणे अंनिस बद्दल माहिती सांगून, पाण्याचा दिवा लावून कार्यक्रमाची सुरुवात केली. NSS च्या 50 विद्यार्थीच नव्हे तर प्राध्यापक वर्ग आणि बामणे गावच्या शाळेतील ही 50 एक विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग कुतूहलाने कार्यक्रम पाहत अनुभवत होते. एकेक चमत्कार सप्रयोग व्याख्यानासोबत माईंनी दाखवला. योग्य ठिकाणी अंनिसची चळवळगीते ही गाईली. सर्वांनी समरसून सहभाग घेतला.  

सादरीकरण संपता संपता विद्यार्थ्यांचे शंकासमाधानही घेतले गेले. त्यानंतर माईंना शाळेच्या शिक्षिकांनीही अनेक प्रश्न विचारून आपले शंकासमाधान करून घेतले हे विशेष. 

शेवटी माईंनी वार्तापत्राबद्दल सविस्तर माहिती दिली आणि सदस्यत्वाचे आवाहन केले 

आणि कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले. 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

म.अंनिस ठाणे शहर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी