वृत्तांत : 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

चमत्कारातून वैज्ञानिक प्रबोधन 

स्थळ : शातीवन, नेरे, पनवेल, ठाणे.

दिनांक : 30 डिसेंबर 2023

वेळ : सकाळी 8:30 ते 10:30


KLE कॉलेज कळंबोलीचे NSS कॅम्प नेरे, पनवेल येथील, विष्णू लक्ष्मी मंदिर येथे आयोजित केले गेले होते. नेहमीच्या जागेची दुरुस्ती सुरू असल्याने गावकऱ्यांनी ह्या स्थळी कॉलेज विद्यार्थ्यांना सहकार्याने उदार मनाने आयोजन करण्यास मुभा दिली होती.  

ज्येष्ठ महाविद्यालय कॉलेज प्राध्यापिका आणि कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघरत्न सर यांचे देखरेखीत एकूण 98विद्यार्थ्यांच्या मोठ्या काफिल्याचे व्यवस्थित नियोजन होत होते. 

अंनिस ज्येष्ठ कार्यकर्त्या माई, वंदना शिंदे यांना चमत्कारातून वैज्ञानिक प्रबोधन करण्यासाठी परिपत्रक पाठविले होते. माईंसोबत कार्यकर्ते अजित डफळे, आणि अँब्रोस चेट्टियार ही उपस्थित होते. चहापान आणि गर्मजोष आगतस्वागत झाले. यावेळी गावातील एका ताईंनी सर्व विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध वर्तनासाठी, मेहनतीसाठी खूप कौतुक केले..  अँब्रोसने अंनिसची आणि माईंच्या कार्याची ओळख करून दिली आणि माईंनी नेहमी प्रमाणे आपल्या खास शैलीत व्याख्यानास सुरुवात केली.. विद्यार्थ्यांचा सहभाग घेत उपस्थित ज्येष्ठ गावकरी यांच्या हस्ते पाण्याचा दिवा लावून कार्यक्रमाची सुरुवात केली. 

तत्पूर्वी टेबलाच्या उजव्या बाजूस अधांतरी बाबा म्हणून एका विद्यार्थ्यास तयार करून अजित आणि अँब्रोसने बसविले होते..

या साठीचे स्टँड माईंनी खास करवून घेतले आहे.. या मुळे कार्यक्रमाला एक वेगळे गंभीर स्वरूप प्राप्त झाले होते..  माईंनी सर्व चमत्कार सप्रयोग व्याख्यानासह स्पष्ट केले.. अधांतरी बाबा, करणीचा नारळ, कापूर खाणे, खिळा पाटावर झोपणे असे जवळ जवळ सर्वच चमत्कार करून पाहण्यासाठी निवडक विद्यार्थी पुढाकार घेत होते.  प्रत्येक चमत्कारागणिक काही चेहरे आश्चर्याने अवाक होत होते. नारळातील करणी निघताच शेवटची एक मुलगी अत्यंत बेचैन होऊन रडू लागली होती. तिला समंजस ग्रुप लीडर विद्यार्थिनीने शांत केले आणि शेवटी माईंशी त्याबाबतीत  संवाद साधला आणि माईंनी यथायोग्य councelling केले आणि त्या विद्यार्थिनीला ताण कमी होऊन  हलके वाटू लागले काही वेळातच ती साथीदारांसोबत नेमून दिलेल्या कामाला ही लागली.. 

कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद होता. तसेच प्राध्यापक वर्ग ही सहभागी होते. अँब्रोसने दरम्यान चळवळीची गीते गाऊन प्रतिसाद मिळवला. माईंनी चमत्कारांमागील विज्ञान सांगून कुतुहल शमवले. तसेच काही विद्यार्थ्यांच्या विविध शंकाचे निरसन केले आणि वार्तापत्रातून अंनिसच्या कार्याची माहिती मिळविण्या करिता सदस्यत्वाचे आवाहन केले. याबरोबरच कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतरही अनेक विद्यार्थी प्रश्न विचारतच होते. त्यांचे समाधान करून त्यांना यापुढे काही शंका उद्भवल्यास संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक दिला. बरोबर 10:30 वाजता कार्यक्रम संपला. आणि अल्पोपहाराची व्यवस्था होती. त्यातील कडधान्ये सूप तर काही भन्नाटच झाले होते. आम्ही सर्वांनी त्याचे खूप कौतुक केले आणि निरोप घेतला. 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

म.अंनिस ठाणे शहर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी