🙏🙏🙏🙏🙏🙏

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर शाखा 

पाक्षिक बैठक वृत्तांत 


अंनिस ज्येष्ठ कार्यकर्त्या माई वंदना शिंदे यांना ऐनवेळी कर्जत येथील एका कार्यक्रमास हजेरी लावणे आवश्यक असल्याने त्यांना बैठकीस येण्यास उशीर होणार होता म्हणून सदस्यांनी बैठक सुरू करावी असा सल्ला त्यांनी दिला होता त्याबरहुकूम अंनिसची नियमित पाक्षिक बैठक रविवार 03 मार्च 2024 रोजी, अंनिस कार्यकर्त्या पुष्पाताई तापोळे यांचे निवासस्थानी वोल्टास कॉलनी वसंतविहार येथे पार पडली. 

या बैठकीस नवीन सभासद उदय छत्रे , पुष्पाताई , तापोळे सर, अथर्व , कल्पना आणि अँब्रोस चेट्टियार इ. उपस्थित होते. ओळख परेड होऊन बैठक चर्चेस सुरुवात झाली. विद्याविहार येथील सोमैया इंजिनीअरींग कॉलेजात प्रोफेसर म्हणून कारकिर्द आणि सेवानिवृत्त झालेले उदय छत्रे सरांनी त्यांचेकडे वडिलांच्या काळापासून आपले अंनिवा वार्तापत्र नियमित येत असे अशी माहिती दिली. तसेच घरातील वातावरण आणि कुटुंबातीलसदस्य हे बऱ्यापैकी अंधश्रद्धानिर्मूलन पोषक असल्याने विचारांची बैठक तशी होण्यास मदत झाली. तसेच सत्यशोधक मंडळाचे कार्याशी ओळख आहे. असे सांगितले . 

तापोळे सरांनी महिलांच्या माथी देवदेव का मारले लादले गेले याबद्दल विचार मांडले. 

बैठकीत माहिती सदरात अंनिसचे संस्थापक डॉक्टर दाभोलकर यांचे एकाच वेळी सीमाजिक प्रबोधन आणि सरकारी स्तरावर अविरत परिश्रम घेऊन  कायदा होण्यासाठीचे परिश्रम यावर अँब्रोस यांनी चर्चा केली. चळवळगीते सदरात गीत गायन करण्यात आले तसेच पुष्पाताई यांनी पुस्तक वाचन सदरात बुवाबाजी च्या प्रश्नावरील डॉक्टर दाभोलकरांचे उत्तर वाचून दाखवले. त्या प्रश्नावरील चर्चेत अद्ययावत माहिती वर चर्चा करण्यात आली. 

पुष्पाताई यांनी बैठकीची उत्तम व्यवस्था ठेवली होती. सदस्यांना विशेष नाश्टा चहा देऊन शेवट गोड केला. 

बैठक बरोबर सव्वासात वाजता संपन्न झाली. 


वृत्तांत शब्दांकन अँब्रोस चेट्टियार, अंनिस कार्यकर्ता. 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर शाखा 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी