*ठाण्यातील बुवाबाजी गजाआड*
गरजू मुली ,महिलांना सावज करून पैशांचा पाऊस पाडण्याचे खोटे प्रलोभन दाखवत लैंगिक शोषण करणाऱ्या ७ जणांच्या टोळीचा पर्दाफाश ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिस पथकाने गजाआड केले. नराधमांनी महाराष्ट्रातील विविध भागातील १७ मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे तपासादरम्यान सिध्द झाले आहे. सर्व आरोपी हे राबोडी भागातच वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई पंजाबराव उगले अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे, शिवराज पाटील पोलिस उपायुक्त , नीलेश सोनवणे सहायक पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील, पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी आदींच्या पथकाने कारवाई केली.
*या सफल धडक कारवाई बद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शाखा ज्येष्ठ कार्यकर्ते माई वंदना शिंदे , कार्यकर्ते राजेंद्र चव्हाण , नितीन भवर, तसेच ठाण्यातील ज्येष्ठ कामगार नेते जगदीश भाई खैरालिया यांनी काल दिनांक 03 मार्च रोजी भेट घेऊन ठाणे पोलिस युनिट एकचे अभिनंदन आणि कौतुक केले प्रत्यक्ष स्थळावर कारवाई करणाऱ्या पोलिस शाखा अधिकारी व पो नी दिलीप पाटील साहेब , पो नी कृष्णा कोकणी साहेब आणि त्यांचे सहकारी यांचे अंनिस ठाणे शाखा द्वारा प्रत्यक्ष भेट घेऊन पत्र देऊन कौतुक केले कौतुकास उत्तर देताना. सामाजिक बांधीलकीच्या अंनिसच्या कामाबद्दल पोलीस अधिकारी यांनी आस्था दाखवली आणि त्यांच्या शाखा युनिट करिता अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जागृती आणि चमत्कारांमागील विज्ञान कार्यक्रम ठेवण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.*
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शाखा.
👉 *वि सू उद्या ठाणे अंनिस शाखे तर्फे याच संदर्भात ठाण्याचे सीपी कार्यालयास भेट देऊन त्यांना ही अभिनंदन आणि कौतुकाचे पत्र देऊन भेट घेण्यात येणार आहे..*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा