विचित्र आहे जरी अविचारी विचार हा
सहज सुटतो नजरेतून परि वाहतो निर्बाध निरंतर
घेत जात आहे पुढे पुढेच पिढ्यानपिढ्याचे करुनी ग्रास हा !

सहृदय जनांची यात मोजणी नाही हे कृपया ध्यानात घ्यावे 🙏
वर्षानुवर्षे करत आलेले एक निरीक्षण मी आपल्यापुढे मांडत आहे. याला पुढे मागे कोणी आकडेवारीचा आधार देऊन याची पुष्टी ही करतील त्यांचे स्वागतच...
तर
अनेक जण घरात शोभिवंत वा वृक्षवल्ली , प्राणी, पक्षी, कुत्री, मांजरी इ पाळतात.. त्यातही विशेषत्वाने त्यांना तसे करण्यास कोणी तथाकथित हितचिंतकांनी सुचविलेले वगैरे असतेसे दिसते.
कुत्री पाळणाऱ्यांचा रानटीपणा दिवसेंदिवस सामान्य जनतेला त्रासदायक होत आहे. आपल्या पाळीव कुत्र्याबद्दल प्रचंड कणव असलेले हेच लोक दुसऱ्याच्या लेकरांच्या बाबतीत कसे हिंस्त्र होतात नकळे... ह्यांची कुत्री त्यांना भुंकतात, प्रसंगी चावा घेतात, रक्तबंबाळ करतात आणि तरीही हे लोक आपल्या जनावरांचाच बचाव करताना दिसतात. असले वागणे असल्या पालकांचे आपल्या हिंस्त्र मुलांच्या ही बाबतीत असते. मग त्यांच्याकडे पाळीव प्राणी असो किंवा नसो असेल पालक समजा साठी घातकच ठरतात. परंतु बरेचदा असल्या लोकांकडे चांगल्या नोकऱ्या आणि उत्तम वा बऱ्यापैकी मालमत्ता असते असे पाहण्यात येते.. आणि काही लोक तसे होऊ पाहण्यात भुललेले असतात घरची आर्थिक स्थिती तशी जेमतेम असली तरी हा अट्टाहास करतात ... हे सर्वथा गंभीर आहे..
आता याबद्दल विचार करता असे दिसते की सामाजिक जीवनात मिसळण्यापासून यांना कोणीतरी अलिप्त ठेवण्यासाठी मुद्दाम असे केलेले असते असे दिसते. अभ्यासाअंती हे निष्कर्ष सहज निघताना आश्चर्य वाटते. एरव्ही रस्त्यावरील मोकाट प्राण्यांनाही हे लोक आपले प्रेम देऊन उतू चाललेले प्राणीप्रेम व्यक्त करू शकतात की.. नाहीतरी भूतदया आपल्या संस्कृतीचा महत्वाचा संस्कार आहे  महत्वाचा भाग आहेच की..
तसेच असले लोक घरातील झाडे , पक्षी , प्राण्याच्या कारणामुळे सहसा मित्रमंडळींना भेटायला वगैरे बागेत वा सामाजिक स्थळांना भेटी देत नाहीत. देऊ शकत नसतात .  ते त्यांना दुरावतात. हा ही  एक कटाचाच भाग असावा का ? आणि कालांतराने इतरांच्या बाबतीत हीनभाव मनात जागृत होताना दृष्टोत्पत्तीस हमखास दिसतो. अशा लोकांची मुले ही प्रचंड वा अती आत्मविश्वास भारित कुणालाही न मोजणारी.. तशी सर्वसाधारणपणे  उद्धट  भासणारी ( असणारी वा फटकून वागणारी ) निपजतात.. मात्र हे सर्व त्यांच्या लक्षात येणे सहज शक्य नाही . त्यामुळे ह्या विषयात मोठे प्रबोधन करणे, होणे आवश्यक आहे ..
याच प्रांतातील आणखी एक प्रकार म्हणजे
घरात कोटी मोठी  शोभेची झाडे,  रोपे आणणे त्यांना जपणे आणि खुल्या मुक्त  पर्यावरणाकडे जंगलांकडे वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होणे , करणे .. तद्वतच सामाजिक प्रश्नांपासून ही त्यांना अलिप्त राखण्याचा कट यात दिसतो. तो सहज समजून येणारा नाही. माणसाला माणसांपासून कसे फोडायचे याचे धडे असल्या सर्व क्रियाकलापांतून लक्षपूर्वक पाहता दिसून येते..
पुढे तसेच समविचारी लोक एकत्र येणे इथपर्यंत ठीक ... मात्र वेगळ्या विचारांच्या लोकांचा दुस्वास करणे इथपर्यंत जेव्हा मजल जाते तेव्हा त्याची तीव्र धग सहृदय जीवाला  जाणवल्या वाचून राहत नाही.. पण प्रसंगी  त्याकरिता वा त्याविरोधात  काही पाऊले उचलण्यास तो सक्षम आहे की नाही हे त्याच्या शारीरिक बौद्धिक मासिक वैचारिक सक्षमतेवर आधारित असल्याने . हे सर्वांना समजून येत नाही .. आणि हे अंतरप्रवाह असेच मोकाट कुठेही शिरकाव करत जात राहतात...
*©अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी