ह्या असल्या निर्णयाला एकूण समाज म्हणून आपण सर्व दोषी आहोत .. पालक म्हणून तर आपल्या कित्येक पिढ्या नालायक ठरल्या आहेत ..आणि त्यात आता तर कळस गाठत चाललो आहोत.. अगदी काही पालक आपल्या व मुलांच्या प्रगती बाबत जागरूक असतात. आणि कसून प्रयत्न करताना दिसतात. बाकी सर्व स्वार्थाने बरबटलेले संकुचित आपल्या पुरते पाहणारे आणि  भरपूर माया येन केन प्रकारेण जमवणारे. 

...हल्ली good parenting चे ही त्यामुळे पेव फुटलेले आहे.. आणि म्हणून हल्ली जोक्स .. *संस्कार हमारे समय कूट कूट  कर भरे जाते थे* वगैरे ही दिसते आहे..आणि जे खरे असले तरी त्या साठी लागणारे श्रम खंबीर प्रयत्न कोणालाच घ्यायचे नसतात.. अगदी गाफील झालो आहोत..

या वरून नुकताच ध्रुव राठी चा व्हिडिओ आठवला आणि तो मुद्दा पटण्यासारखा आहे ...


*जेव्हा जेव्हा एखाद्या देशाची जनता गाफील झाली तेव्हा तेव्हा ते ते देश रसातळाला गेले आहेत..*


होईल सर्व ठीक हा भाव सोडायला हवा .तसे होत नसते सर्व नष्ट होते ...काही आपसूक  ठीक होत नसते. प्रचंड मेहनत घ्यावी लागते. झटावे लागते. नुसते वाभाडे काढूनही जमत नसते. प्रत्येकाचे प्रयत्न लागतात समाजाला सर्वंकष सर्वांगीण विकास साधायला वा टिकवायला. स्वेच्छेने वा कायद्याच्या बडग्याने ते संघटितरित्या साधावे लागते. तशा योजना आखाव्या लागतात. आणि इथे तर मानवीय दृष्टीच्या लोकांपेक्षा अमानवीय दृष्टीच्या लोकांकडे योजनांची भरभक्कम तयारी दिसून येते . ज्याचा परिपाक आजची परिस्थिती आहे.. आहेच की आता त्यांची पुढची पायरी npr आणि वगैरे वगैरे.. chronology हो... 

सर्व सर्व भयंकर विषण्ण करणारे आहे पण याला कारणीभूत मीही आहेच ना ... मग भोगायचे .. वा प्रयत्न करायचे .. त्या करिता निर्भय व्हायलाच हवे.. निडर व्हायलाच हवे आणि निरंतर निर्भय राहायला हवे .. गांधीजी निर्भय होते ते आपलाही न भिता कुरवाळत आणि ते आपल्या वाटेने जाई.. शिष्य नेहरू निर्भय झाले वाघाला सामोरे जात.. तेव्हाच तर प्रगती झाली .. त्यांच किती तो धाक होता.. आज ही लोकांची घाबरगुंडी उडवणारा धाक तो.. तरीही जनतेला गाफील ठेवण्या करण्याचे कार्यक्रम आखणारे स्वस्थ बसलेच नाहीत आणि गाफिलांची संख्या वाढत गेली आणि आज जनता अधोगतीला प्राप्त झाली.. चूक सर्वांचीच आहे.. काही बुद्धिजीवी आज ही तशा वा त्याहून  भयंकर चुका करण्यास कचरत नाहीत.. पुढच्या पिढ्या नष्ट करण्याचे पक्के कार्यक्रम आखतात आणि त्यांना जराही लाज वाटत नाही.. कारण ? जनता गाफील आहे.. प्रश्न विचारणार कोण ? जनतेला पद्धतशीरपणे षंढ बनवण्यात आले आहे.. हम्म! म्हणजे वाटते तेवढे वर वर चे नाही हे खोल खोल आहे... भरपूर मोठे काम आहे.. अगदीच ढवळून काढणारे हे प्रश्न आहेत...

हा एवढ्या तेवढ्याने लगेच संपणारा विषय नाही...... 🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी