🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*


पाक्षिक बैठक वृत्तान्त

*रविवर दिनांक 31मार्च 2024* रोजी सायंकाळी 5वाजता

माई वंदना शिंदे यांचे निवासस्थानी झालेल्या मीटिंग मध्ये.


👉 गेल्या आठवड्यांतील ठळक घडामोडींविषयी चर्चा झाली. मुरबाड येथील हादरवून टाकणारी घटना त्याचा पाठपुरावा आणि पीडित कुटुंबास न्याय मिळवून देण्यास अंनिस च्या यशस्वी प्रयत्नांची माईंनी माहिती दिली..


👉 *पुढील पाक्षिक बैठक दिनांक  महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी म्हणजे 14एप्रिल रोजी घेण्याचे नियोजित आहे.*

👉 पुस्तक वाचन  या सदरात  संजय रेंदाळकर यांचे संकलित सत्यशोधक या पुस्तकाचे जोतिबांच्या विचारधन हे सदर वाचले.

👉 चळवळ गीत गायन सदरात डॉक्टर दाभोलकरांचे अभिवादन गीत गायिले गेले . 

👉 संस्थेविषयी माहितीपूर्ण सदर संस्थेचे कार्य कायदा झाल्यानंतर ची उल्लेखनीय कामगिरी आता पर्यंत पकडलेल्या बाबा बुवा यांच्या पैकी जवळ जवळ 80% बाबा लोक हे गैर हिंदू आहेत .. यावर चर्चा झाली..


👉 ऐनवेळी उपस्थित विषय संबंधी.. सोशल मीडिया प्रशिक्षण विभागाच्या शिबिराची माहिती आणि त्याकरिता सहभाग याची यादी निश्चित करण्यात आली..

तसेच 

अंनिस कार्यकर्ता महेश कांबळे यांचे डॉक्टर दाभोलकरांचे साहित्य संकलित स्वरूपात ग्रूपवर टाकून करण्यात येणाऱ्या प्रबोधन कार्याचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले. 

*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*

🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी