तू

तू

रमतोस तू फुलातुनी
रमतोस तू खडकातही
रमतोस तू जिवातुनी
रमतोस निर्मितीतही

जगणे तुझे स्मरावे
मृदेतूनी फुलावे
हा देह झिजविशी असा
मृदेत प्राण ओतुनी

तुझ्यात दंभ कोठला
तुझ्यात मीपणा नसे
वाताजळाशी एक हो
वसतोस तू मनांतुनी

शंकांचे घोर बाहुले
मज मीच पारखीतसे
निशंक तू हवास तू
निर्व्याज प्रेम वाटुनी

मी भेद शोधतो आहे
मज सापडे न काही रे
पूर्णात पूर्ण जाहला
माझाच अंश होऊनी
     © अँब्रोस चेट्टियार


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी