महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर शाखा.

वृत्तांत

शनिवार,

दिनांक :13 एप्रिल 2024


समता विचार प्रसारक मंडळ ठाणेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात म. अंनिसचा वैज्ञानिक दृष्टीकोन कार्यक्रम सादर.


   सालाबादप्रमाणे समता विचार प्रसारक मंडळाचे आजी माजी एकलव्य विद्यार्थी आणि कार्यकर्ते यांचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि निवासी शिबिर दिनांक 13एप्रिल 2024 ते 16 एप्रिल 2024दरम्यान आयोजित असून पार पडत आहे. 

    विविध कार्यक्रमांच्या आयोजनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार हे आपले शैक्षणिक आणि संवैधानिक ध्येय , उद्दिष्ट आणि राष्ट्रीय कर्तव्य याची यथोचित जाणीव ठेवून संस्थेने *म.अंनिसचे चमत्कारातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचे सप्रयोग व्याख्यान आयोजित केले होते.. 

अंनिस ज्येष्ठ कार्यकर्त्या माई वंदना शिंदे यांनी कार्यकर्ते अजित डफळे यांचे समवेत कार्यक्रम सादर केला. सुमारे 35 विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे प्राचार्य शिक्षक शिक्षिका आणि स वि प्र मं चे कार्यकर्ते असा सर्वांनी कार्यक्रमात समरसून सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी माईंना आपल्या शाळेत कार्यक्रमास पाहिल्याची ग्वाही दिली.. चमत्कार प्रात्यक्षिकांत उत्स्फूर्तपणे विद्यार्थी आणि शिक्षक-प्राचार्या यांनीही भाग घेतला . खिळा पाटावर झोपून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले तसेच त्यामागील विज्ञान जाणून घेण्यास उत्सुकता वाढविली..  सप्रयोग व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे, शंका-समाधान आणि त्यातून आत्मविश्वास यात कार्यक्रम रंजकतेने सफल संपन्न झाला.. 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर शाखा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी