अनेक महात्मे वा महान लोक ,क्षेत्र कोणतेही असो मग , घडले घडवले गेले. त्याबद्दल थोडा डोळस विचार करूयात .. त्या त्या , *देश काल परिस्थितीनुसार* असे म्हणायची पद्धत आहे. परंतु त्यात समाज आणि सहायक..इत्यादी असे जोडून पूर्ण करायला हवे ते असे देश, काल परिस्थिती, स्वयंप्रेरणा, समाज, आणि सहायकानुसार महात्मे होऊन गेलेले आहेत. आता ही काय भानगड आहे बरं? तर लक्षपूर्वक पाहिल्यास आपल्या लक्षात हे सत्य आणि त्यातील तथ्य आल्यावाचून राहणार नाही. स्वयम् प्रेरणेने घडलेले महात्मे सोडले तर बाकीचे महात्मे त्यांचे छान मार्केटिंग संबंधित लाभार्थी गट करत असतात असे आढळेल. हे काहीतरी खूप विचित्र आणि धाडसाचे वाटते आहे ना ? पण पहाच तुम्ही हे असेच असते. प्रकृती, भूतदया, समाज, जागृती , इत्यादी अनेक विषयावर काम करणारे अनेक आदरणीय महात्मे होऊन गेले आहेत , आहेत.. त्या सर्वानाच नमन..
हे जे काही वर चर्चिलेले आहे ते सविस्तर कळण्यास समजण्यास कोणतेही दोन महात्मे घ्या आणि त्यांचा जीवनपट जुळवून पहा त्यावर विचार करा.. कार्यकारण भाव आणि त्या त्या घडामोडीमागील प्रेरणा वा सहाय्यक शक्तींचा शोध घेतला तर बराच काही उलगडा होत जातो.
मानवतेसाठी प्राण वेचणारे सर्व महात्मे हे स्वयंप्रेरणेने सिद्ध झाले हे मात्र निर्विवाद..बाकी ईतर अनेक प्रकारातील सर्वोच्च स्थानी असणारे महान लोक पहा..त्यांचे निरीक्षण करता अभ्यास करता..
असेच दिसून येईल की पहिल्या भागातील महात्म्यांपेक्षा हे खूपच फुरसत मध्ये अथवा विशेष मेहनतीने घडले घडवले गेले आहेत.. क्रमशः....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा