देणे सृष्टीचे
उमलून फुल ते फुलले बहरले
सुख वाटुनी लयास गेले
चक्र प्रकृतीचे चलायमान
रथ अविरत फिरत राहिलेले
रंग गंध नी चित्र मनोहर
मोहून घेई पुष्प पर्ण तर
नजर रोखुनी पाहू निर्झर
वाहे घन नीर मोकळाले
केवळ स्मरण मात्र चित्र ते
आठवणीतून मागे नेते
रम्य काळ तो आता नुरला
मुठीतुनी वाळू गळलेले
पुन्हा हिरवी ही सृष्टी होईल
पान फूल रस गंध नी दरवळ
नव्या पिढीला मोहून टाकील
कळून मर्म मग तेच राखतील
मागील पिढ्यांचे जे चुकलेले
मागील पिढ्यांचे जे चुकलेले
©अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा