अर्रे मतचोरांनो
चोर तुम्ही करणार तुम्हाला
फक्त येतसे चोरी
देणे घेणे अन् लाटालाटी
एकच तुमची नीती
चोर तुम्ही करणार तुम्हाला
फक्त येतसे चोरी
थुंकावे वा चाटावे हा
खेळ तुम्हाला प्यारा
आदेशाचे पालन जीवन
हीच तुमची थेरी
चोर तुम्ही करणार तुम्हाला
फक्त येतसे चोरी
देणे घेणे अन् लाटालाटी
एकच तुमची नीती
चोर तुम्ही करणार तुम्हाला
फक्त येतसे चोरी
मगरीला ही लाजविणारे
उलटे काळिज तुमचे
दुग्धामृतही पाजुनी झाले
विष फुटले नंबरी
चोर तुम्ही करणार तुम्हाला
फक्त येतसे चोरी
देणे घेणे अन् लाटालाटी
एकच तुमची नीती
चोर तुम्ही करणार तुम्हाला
फक्त येतसे चोरी
जनतेचे हित मानवताहित
तुमच्या गावी कसला
गरीब लुटावे स्वार्थ साधनी
एकच जप अंतरी
चोर तुम्ही करणार तुम्हाला
फक्त येतसे चोरी
देणे घेणे अन् लाटालाटी
एकच तुमची नीती
चोर तुम्ही करणार तुम्हाला
फक्त येतसे चोरी
*आपलाच मतदार*
*अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा