एक एक रोप
चल रोप रोपुया गड्या
बरगड्या शाबूत हाईत जोवर
रान मोकळे उजाड जंगल
देई सरण मग कुठवर ?
चल रोप रोपुया गड्या
भ्रांत उद्याची नाही राजा
देह अपुला मिळता भूता
का न करावे अर्पण नश्वर
देह सृष्टिशी आपण सत्वर
चल रोप रोपुया गड्या
आपण राखू आपण चाखू
सन्मानाने आदर देखू
रोप रोपुनी वृक्षराजीचा
फुलवू हिरवा डोगर
चल रोप रोपुया गड्या
झाड राखुनी जीवन जगवू
पीढी उद्याची आजच राखू
व्यर्थ न व्हावे सुखस्वप्न हे
घाम गाळुनि कष्टू भरभर
चल रोप रोपुया गड्या
वेळ मोडता अनर्थ घडतो
गाफील होता दुर्जन चढतो
डोळस तत्पर कार्यमग्न हो
निसर्गरक्षण ध्येय आयुभर
चल रोप रोपुया गड्या
*अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा