....नुकतेच महाबळेश्वरला जाणे झाले आणि आश्चर्याचा भयंकर धक्का बसला .. जातानाचा प्रवास रात्रीचा झाला असला तरी पण पहाटे पासून घाट आणि आसपासचा प्रदेश,    वाटेवरील डोंगर रांगा यांचे दर्शन झाले आणि धस्स झाले. उघडे बोडके रखरखीत डोंगर दिसले..खूप दुःख झाले..फक्त उंची मुळे जो काय थंडावा मिळेल तो मिळेल त्यात विशेष काय ती तफावत असणार ? वातावरण शुष्क आणि किंचित अगदी किंचित कमी गरम ठाण्या मुंबईच्या तुलनेत म्हणा .. थंड असे म्हणताच येणार नाही इतके असे  .. अर्थात भर उन्हाळ्यात असेच असणार ना ? पण आपल्याकडील सुप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांत महाबळेश्र्वरचा क्रमांक तसा वरचा लागत असतो. अशा ह्या ठिकाणी लोक उन्हाळ्यातच सहसा जातात ना ? मग? एवढे नामांकित स्थान पण नेहमीपेक्षा वेगळा असा फक्त प्रवास आणि थोडेसे आल्हाददायक असे व्यावसायिक भटकंतीचे वा व्यावसायिक प्रेक्षणीय स्थळ इतकेच उरलेले आहे की काय ?..बाकी बजबजाट आणि बजबजपुरी म्हणाल तर मात्र व्यवस्थित माजलेली दिसते. 

....निसर्गरम्य अशा ठिकाणी स्थानिक म्हणून सामान्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांची, ज्येष्ठ विचारवंत, नेते व तत्सम सर्वच लोकांची काही विशेष जबाबदारी असायला हवी की नाही ? कसे राखायचे आपले विशेष जपलेले ऐतिहासिक स्थळ वगैरे?  

ईतर देशात अशा ठिकाणांसाठी काही विशेष आचारसंहिता, नियमावली असत असेल का ? आपण आपल्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक विविधतेचे कसे संगोपन संवर्धन करता येईल याचा विचार व्हायला हवा? लवकरच येथे rope way होईल अशी माहिती कुणीतरी तिकडे दिली .. म्हणजे पुन्हा व्यवसायच ना.. तेथील व्यवसायात काही खास विशेष म्हणावे असे स्थानिकांचे स्थान दिसत नाही हे खूप चिंताजनक वाटले.. कदाचित राजकीय, सामाजिक जाणिवांची कमतरता आणि उदासीनता किंवा आणखी काही वेगळेच राजकारण शिजत असावे का ? कारण पर्यटक तर सतत दिसत आहेत. तरी घाट चढताना खालपासून पार वर जाऊन पोहोचे पर्यंत मनोरम अशी हिरवाई हिरवळ राखलेली वृक्षराजी वा संवर्धित जंगल वगैरे दृष्टीस पडत नाही . असे सर्व वैचित्र्यपूर्ण,  रखरखीतपणा पाहून अतीव दुःख झाले .. बुरुज वजा टेहळणीच्या अनेक स्थळांवरील अनेक स्थानांपासून दुर्बिणीतून महाराजांचे प्रतापगडावरील सिंहासनाधिष्टित पुतळ्याचे दर्शन घेताना धाकधूक होत होती. महाराज यासर्वाबद्दल आपल्याला जाब विचारतील की काय असे सतत वाटत होते. परंतु मनोमन "महाराज ह्या प्रकारा बद्दल माफी असावी अभय असावे ..आणि वाटचाली साठी आपणच मार्गदर्शन करावे" असा महाराजांचाच धावा करत त्यांचे रोमांचित करणारे दर्शन घेतले..  दोन दिवसांनीं महाबळेश्वर उतार होताना पुन्हा निसर्गाच्या अशा ऱ्हासाचे दर्शन, विचलित करणाऱ्या निष्काळजीपणाचे दर्शन मन विषण्ण विषण्ण करून टाकत होते..

क्रमशः..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी