बहीण

बहिणीची माया
आईची साऊली
माऊलीचे प्रेम
माऊली मागे

नसे पारावार
तिच्या प्रेमाला
सरसच भासे
दुजी ही माऊली

मायबाप नसता
आसपास कोणी
घार होऊनी
रक्षिते पिलांस

येताच अरिष्ट
होतसे वाघीण
तिच्या लीलेस
ठाव तो नाही..

नावाला बहीण
सखा बंधू बाप
अंतरीची माता
सदाचीच

सहोदर जीवन
तिचे जग सारे
भावंडांचे सुख
सर्वोपरी

हसत खेळत
कंठते जीवन
प्रेमरूप करी
जीवनसंघर्ष
*©अँब्रोस चेट्टियार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी