द्रष्टा राजा
द्रष्टा राजा
काळापुढचे पाहतो
असा लोकराजा
भेदभावाला गाडीतो
असा लोकराजा
जातीभेदाला तोडितो
असा लोकराजा
अन्यायाला रोखतो
असा लोकराजा
शिक्षणास जो आणी पुढे
असा लोकराजा
सर्व समाजा प्रगत करी
असा लोकराजा
लेकीबाळी सुखावतो
असा लोकराजा
विद्या कला दे परिपूर्ण
असा लोकराजा
श्रमणाऱ्याचे मोल करी
असा लोकराजा
नागरिकास दे अधिकार
असा लोकराजा
विज्ञानाचा पुरस्कर्ता
असा लोकराजा
काळासोबत नित नवा
असा लोकराजा
गुणगौरव पडे कमी जयाचे
असा लोकराजा
गावे ज्याचे गीत सदा
असा लोकराजा
*© अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा