सारव
सारव
रस्ता सारव सारव सारव
ह्याने रस्त्यात खणली बारव
बोलाची कढी बोलाचा भात
सारं बेचव बेचव बेचव
कशाचा कशाला सूरच नाही
ग्यास शेगडी धूरच नाही
ब्यांकेचे खाते खातच ऱ्हाते
(तू) साठव साठव साठव
ह्याने रस्त्यात खणली बारव
हात धरून सोबत येतो
हाताला धरून बाहेर काढतो
प्रस्थापितांची आसने गदगदा
हलव हलव हलव
ह्याने रस्त्यात खणली बारव
येण्या जाण्याचा मार्ग कशाला
आला तो जाई येथून कशाला
मित्रांचे पोट मित्रांची खळगी
भरव भरव भरव
ह्याने रस्त्यात खणली बारव
राजा तुलाच कळले आता
चुकीची कधी निवड होता
कामे टाकून प्रथम त्याला
हटव हटव हटव
ह्याने रस्त्यात खणली बारव
*©अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा