प्रकाश

प्रकाश

दर्शन नको रे
नको भगवंता
किती मोठी रांगं
तुडवू मी आता

इथवर येता येता
एक उमगले
माझे प्रश्न मीच
सोडवावे आता

जगी नाही शक्ती
प्रकृती वाचून
उगा खेळविले
घाबरट जीवा

इथे येण्या पायपीट
श्रम वेळ व्यर्थ
उद्योगात गुंतविता
हमखास यश

सान थोर होती शाणे
असेच करावे
ग्राम ज्ञान गीताने
हुशार करावे

हाच विडा हाती घेउन
जन मन गावे
प्रकाशाने काळोखास
दूर पळवावे....
  *© अँब्रोस चेट्टियार*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी