नीट नेटके
नीट नेटके
केले ते नेट के
नीट ची केले
केले सर्व अब्रू
घालवाया
कोणाची परीक्षा
कोण घेत आहे
जाणावया मर्म
कोणी नाही
निर्लज्जास घाली
पागोटे पटs के
भुकेल्यास येथे
पाणी नाही
हातचे तोंडचे
काढून घेण्यात
कर्दनकाळ
पटाईत
त्यावरी बोलोने
जनतेने काही
मुकाट भोगावे
दिस दाविलेले
यावरी उतार
जन मन मत
यास बळी पुन्हा
पडता नये
*© अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा