बुट्टी

नुकतीच झालेली अगदी ओव्हन फ्रेश रचना
😊🙏😊🙏😊🙏😊
आशीर्वाद असू द्यावात
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

बुट्टी

आज म्हणे पावसाची
गंमतच झाली
येतो येतो म्हणून त्याने
बुट्टीच केली

कारे बाबा असे केलेस
आईने विचारता
सर्व मुलांना सुट्टी जाहीर
असे झाला बोलता

स्मित करून मायेने
त्याच्या कडे पाहिले
टपली मारून अलगद
कुशीतच घेतले

सर्व मुलांच्या मनातले
आई होती जाणून
अशा वेळी आईची
कूस लागते म्हणून

गप्पा गोष्टी दोघांच्या
खूप होत्या झाल्या
आईने शिस्तीचा मग
एक धडा दिला

काहीही झाले आणि
ऐकले काही
आपण बाळा वाट आपली
सोडायची नाही

बाळाने उमजून मर्म
हलकेच उठला
मोठा नाही पण सरसर-रिमझिम
बरसून आला
  *©अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी