कुणाच्या खांद्यावर
कुणाच्या खांद्यावर
कुणाच्या खांद्यावर वर
कुणाचे ब्वा डोके
कुणाच्या डोस्क्यात ब्वा
मेंदू कुणाचे
कुणाच्या तोंडात ब्वा
जीभ कुणाची
नीट पहा म्हणजे कळेल
काय झाली गोची
मला काय त्याचे सूर
जिकडे तिकडे दिसतो
फुटेल तुमचा ऊर मात्र
असे नाटक वठते
चांगला दिसला जाणवला की
लगेचच कुंपण
सत्याला गाडून पुन्हा
पाढे पंचावन्न
यांचे रडगाणे कधी
संपतच नसते
गरिबाच्या तोंडाला
कोण पाने पुसते
गाजावाजा मोठा होतो
कार्य नाही दिसत
ओंजळीत येईल कसे
आडात नाही असत
भूतदया बंधुभाव
जो कोणी जगतो
जो तो उठतो उपटसुंभ
त्याला प्रश्न करतो
डोळ्यावर घालून बसती
तलम रेशमी झापड
उल्लेख त्याचा कोणी करता
होती तीळपापड
ज्यांच्या साठी राबतात
सज्जनाचे हात
सोडून दुज्या भित्रे स्वार्थी
मूर्ख देती साथ.....
*© अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा